वाक्प्रचार व त्यांचा अर्थ याचा दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो. दैनंदिन व्यवहारामध्ये बोलण्या बरोबरच साहित्यामध्ये वाक्प्रचारांचा वापर केला जातो. निरनिराळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेक प्रश्न विचारले जातात.
- अंग चोरणे- फारच थोडे काम करणे.
- अंगाची लाही लाही होणे-अतिशय संताप येणे.
- अंगात वीज संचारणे- अचानक बळ येणे.
- अंगवळणी पडणे- सवय होणे.
- उर भरून येणे- गदगदून येणे.
- कपाळ फुटणे- दुर्दैव ओढवणे.
- कपाळमोक्ष होणे- मृत्यू येणे, अचानक येणाऱ्या संकटाने उध्वस्त होणे.
- कपाळाला हात लावणे- हताश होणे, निराश होणे.
- काढता पाय घेणे- विरोधी परिस्थिती पाहून निघून जाणे .
- कानउघाडणी करणे- चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे.
- कान उपटणे- कडक शब्दात समजावणे.
- कान टोचणे- खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
- कान निवणे- ऐकुन समाधान करणे.
- कान फुंकणे- चुगली/ चहाडी करणे.
- कानाने हलका असणे- कशावरही पटकन विश्वास ठेवणे.
- कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
- कानाला खडा लावणे- एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे.
- कानावर हात ठेवणे- नाकबूल करणे.
- कानीकपाळी ओरडणे- एक सारखे बजावून सांगणे.
- कानावर घालणे- लक्षात आणून देणे.
- कानोसा घेणे- अंदाज किंवा चाहूल घेणे.
- केसाने गळा कापणे- घात करणे.
- कंठ दाटून येणे- गहिवरून येणे.
- कंठस्नान घालने- शिरच्छेद करणे.
- कंठाशी प्राण येणे- खूप कासावीस होणे.
- कंबर कसणे- जिद्दीने तयार होणे.
- कंबर खचणे- धीर सुटणे.
- खांद्याला खांदा भिडवने- सहकार्य व एकजुटीने काम करणे.
- डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.
- डोळ्यात धूळ फेकणे- खोटेनाटे सांगून फसवणे.
- डोळ्याला डोळा न लागणे- झोप न येणे.
- डोळ्याचे पारणे फिटणे- समाधान होणे किंवा पाहून आनंदित होणे.
- डोळे विस्फारणे- आश्चर्याने पाहणे.
- डोळ्यातून थेंब न काढणे- मोठा आघात होऊनही न रडणे.
- तळपायाची आग मस्तकात जाणे- अतिशय संतापने.
- तोंड काळे करणे- कायमचे निघून जाणे.
- तोंडघशी पडणे- विश्वास घात होणे / अडचणीत येणे.
- तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे.
- तोंड देणे- सामना करणे
- तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे.
- तोंड भरून बोलणे- मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे.
- तोंड वेंगाडणे- याचना करणे.
- तोंड सांभाळून बोलणे- जपून बोलणे.
- तोंड सुख घेणे- दोष देताना वाटेल तसे बोलणे.
- तोंडाची वाफ दवडणे- वायफळ बडबड करणे.
- तोंडात बोट घालणे- आश्चर्यचकित होणे.
- तोंडाला पाणी सुटणे- हाव निर्माण होणे.
- दात ओठ खाणे- चीड व्यक्त करणे.
- दात धरणे- सूड घेण्याची भावना बाळगणे.
- दात विचकणे- निर्लज्जपणे असणे.
- दाताच्या कण्या करणे- वारंवार विनंती करणे.
- दाती तृण धरणे- शरण जाणे.
- नजर चुकवणे- न दिसेल अशी हालचाल करणे.
- नवल वाटणे- आश्चर्य वाटणे, चकित होणे.
- नाक उडवणे- थट्टा, उपास करणे
- नाक कापणे- थट्टा उपहास करणे
- नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगाच सहभाग घेणे
- नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
- नाक मुरडणे- नापसंती दाखवणे, उपहास करणे
- नाकाने कांदे सोलने- जास्तीचे शहाणपण दाखवणे
- नाकी नऊ येणे- फार दमणे
- पदरात घेणे- स्वीकारणे
- पदरात घालने- चूक पटवून देणे
- पाठ थोपटने- शाबासकी देणे, कौतुक करणे
- पाठीशी घालणे- संरक्षण देणे
- पाठ दाखवणे- समोरून पळून जाणे
- पाठ पुरवणे- सारखे मागे लागणे
- पाठबळ असणे- आधार असणे
- पाठीला पोट लागणे- उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे
- पाठ न सोडणे- एखाद्या गोष्टीचा पिच्चा पुरवणे
- पाढा वाचणे- सविस्तर सांगणे
- पाणी दाखवणे- सामर्थ्य दाखवणे
- पाणी पडणे- वाया जाणे, नष्ट होणे
- पाणी मुरणे- कपटाने काहीतरी लपवून ठेवणे
- पाणी पाजणे- पराभव करणे
- पाणी सोडणे- अशा सोडणे
- पाय काढणे- विरोधी परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे
- पाय घसरणे- तोल जाणे, मोहात फसणे
- पायबंद घालने- आळा घालणे
- पाय मोकळे करणे- फिरायला जाणे
- स्वतःच्या पायावर उभे राहणे- स्वतंत्र किंवा स्वावलंबी होणे
- पोटात कावळे कोकळणे- खूप भूक लागणे
- पोटात ठेवणे- गुपित सांभाळून ठेवणे
- पोटात शिरणे- मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे
- पोटाला चिमटा घेणे- अत्यंत काटकसरीने राहणे
- पोटावर पाय देणे- रोजंदारी बंद करणे
- पोटाशी धरणे- माया करणे, कुशीत घेणे
- प्राणापेक्षा जपणे- स्वतःच्या इत जिवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे
- बोटावर नाचवणे- हवे तसे खेळवणे
- मनात अढी धरणे- एखाद्याविषयी मनात राग निर्माण होणे
- मांडीवर घेणे- दत्तक घेणे
- मुठीत असणे- ताब्यात असणे
- रक्त आटवणे- अतीकष्ट करणे
- रक्ताचे पाणी करणे- अतिश्रम करणे
- हाडांची काडे करणे- अतिकष्ट करणे
- हाडे खिळखिळी करणे- भरपूर चोप देणे
- हात आखडणे- देण्याची क्षमता असतानाही कमी देणे
- हातघाईवर येणे- मारमारीची पाळी निर्माण करणे
- हातचा मळ असणे- एखादी गोष्ट सहज करता येणे
- हात झटकणे- नामानिराळा होणे
- हात टेकणे- नाईलाजाने शरण येणे
- हात दाखवणे- मार देणे, फसवणे
- हात देणे- मदत करणे
- हात मारणे- ताव मारणे
- हातातोंडाशी गाठ पडणे- जेमतेम खायला मिळणे
- हातापाया पडणे- लाचारीने विनवण्या करणे
- हातावर तुरी देने- डोळ्यादेखत फसवून पळणे
- दोन हात करणे- सामना करणे, टक्कर देणे
- हृदय भरून येणे- गदगदून येणे
- अधीर होणे - उत्सुक होणे.
- अन्नान होणे - गरीबीमुळे खायला न मिळणे.
- .
- अभिमान वाटणे - गर्व वाटणे.
- अभिवादन करणे - नमस्कार करणे.
- अंदाज बांधणे - अटकळ बांधणे, तर्क करणे.
- अंगाची लाहीलाही होणे- अतिशय संताप येणे.
- .
- अपव्यय टाळणे- दुरुपयोग न करणे.
- अन्नाला जागणे- कृतज्ञ असणे.
- अत्तराचे दिवे जाळणे - मूर्खपणाने उधळपट्टी करणे.
- आश्चर्य वाटणे -नवल वाटणे.
- .
- आकाश ठेंगणे वाटणे - खूप आनंद होणे.
- आव्हान देणे - संघर्षाला आ
- .
- आडवे होणे- झोपणे.
- .
- आवर्जून पाहणे - मुद्दाम पाहणे.
- आभाळ कोसळणे- मोठे संकट येणे.
- आहुती देणे- बलिदान देणे.
- आरंभ होणे - सुरुवात होणे.
- इनाम देणे - बक्षीस देणे.
- उदास होणे - खिन्न होणे.
- उदरनिर्वाह करणे - उपजीविका करणे.
- उत्तेजन देणे- प्रोत्साहन देणे .
- उघड्यावर टाकणे - निराधार करणे.
- उपकार फेडणे - उतराई होणे, कृतज्ञता दाखवणे.
- उंबरठा ओलांडणे - मर्यादा सोडणे.
- उत्तेजन देणे - प्रोत्साहन देणे.
- कंठ दाटून येणे - गहिवरून येणे, रडू येणे.
- कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.
- कंबर कसणे - तयार होणे.
- कान देणे - लक्षपूर्वक ऐकणे.
- कानात वारे शिरणे - बेभान होणे.
- कानामागे टाकणे- दुर्लक्ष करणे.
- .
- काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.
- केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने घात करणे.
- कानोसा घेणे- अंदाज घेणे
- .
- कागाळी करणे - तक्रार करणे.
- कंप पावणे - थरथरणे.
- .
- कोसळणे - जोरात पडणे.
- .
- कुरवाळणे - गोंजारणे.
- कान झाकून घेणे - न ऐकणे, दुर्लक्ष करणे.
- करुणा करणे - दया दाखवणे.
- खडानखडा माहिती असणे - बारीकसारीक गोष्टी माहिती असणे.
- खळगी भरणे- पोट भरणे.
- .
- खंड पडणे- काम मध्येच थांबणे.
- खो घालने- कामात विघ्न आणणे.
- गुबगुबीत होणे - लठ्ठ होणे.
- गळ घालणे -अतिशय आग्रह करणे.
- गुजराण करणे - निर्वाह करणे.
- .
- गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.
- घाबरगुंडी उडणे - खूप घाबरणे.
- घाम गाळणे - कष्ट करणे.
- घर डोक्यावर घेणे - खूप दंगा करणे.
- .
- चिंतेत पडणे - काळजीत पडणे.
- .
- चक्कर मारणे - फेरफटका मारणे.
- जळून खाक होणे- पूर्ण जळून राख होणे.
- जीभ सैल सोडणे- वाटेल तसे बोलणे.
- .
- झुंबड उडणे- खूप गर्दी होणे.
- .
- झेंडू फुटणे- खूप भीती वाटणे.
- टोमणा मारणे- खोचकपणे बोलणे.
- डोळ्याचे पारणे फिटणे - अतिशय प्रसन्न होणे.
- डोळा लागणे - झोप लागणे.
- .
- डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.
- डोळ्यात खुपणे- मत्सर करणे.
- डोळा लागणे- झोप लागणे.
- डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
- तणतणत निघून जाणे- खूप रागाने निघून जाणे.
- तल्लीन होणे- गुंग होणे.
- .
- ताव मारणे - भरपूर खाणे.
- तोंड देणे - सामना करणे.
- .
- दम लागणे- धाप लागणे.
- .
- दिवस फिरणे- वाईट दिवस येणे.
- .
- धूम ठोकणे- पळून जाणे.
- .
- धारातीर्थी पडणे- लढाईत मरण येणे.
- .
- नाव मिळवणे- कीर्ती मिळवणे.
- .
- पाठ थोपटने- शाबासकी देणे.
- पाठबळ असणे- आधार असणे.
- .
- पोटात कावळे ओरडणे - खूप भूक लागणे.
- प्रशंसा करणे - स्तुती करणे.
- पोटाशी धरणे - मायेने कुशीत घेणे.
- .
- तोंडात शेण घालणे- पराकोटीची निंदा करणे.
- तोंडाला कुलूप घालणे- गप्प बसणे.
- तोंडाला तोंड देणे- भांडणे.
- पारा चढणे - राग येणे.
- प्राणाला मुकले - जीव जाणे, मरण येणे.
- फडशा पडणे- खाऊन संपवणे.
- .
- बाचाबाची होणे - शाब्दिक भांडण होणे.
- .
- बेत करणे - योजना आखणे.
- भारी वाटणे- चांगले वाटणे.
- मुठीत असणे- ताब्यात असणे.
- .
- मान्य करणे - कबूल करणे.
- .
- मार्ग काढणे - रस्ता काढणे, मार्ग काढणे.
- मुग्ध होणे - मोहित होणे.
- .
- दिवस पालटणे - चांगले दिवस येणे.
- देखरेख करणे - राखण करणे.
- दंग असणे - मग्न असणे.
- धुळीस मिळणे - नष्ट होणे.
- .
- धडपड करणे - खूप कष्ट करणे.
- नाळ तोडणे - संबंध तोडणे.
- रस असणे - रुची असणे, आवड असणे.
- .
- लळा लागणे - ओढ वाटणे.
- वनवन करणे - खूप भटकणे.
- वीरगती प्राप्त होणे - देशासाठी लढताना मरण येणे.
- समाधानाची ढेकर देणे - जेवून तृप्त होणे.
- संघर्ष करणे - झुंजणे, लढणे.
- संकल्प करणे - एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे.
- .
- सतर्क असणे - दक्ष असणे.
- स्तुती करणे - प्रशंसा
- सहाय्य करणे - मदत करणे.
- हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.
- हात देणे- मदत करणे.
- हातावर तुरी देणे- फसवून पळून जाणे.
- .
- हरभऱ्याच्या झाडावर चढवणे- खोटी स्तुती करणे.
- हाय खाणे- धास्ती घेणे.
- .
- हायसे वाटणे- समाधान वाटणे.
- हुलकावणी देणे- फसवणे.
- गळा काढणे- मोठ्याने रडणे.
- गळा गुंतणे- अडचणीत सापडणे.
- गळ्यात गळा घालणे- खूप मैत्री करणे.
- गळ्यातला ताईत होणे- अत्यंत आवडता होणे.
- गळ्यापर्यंत बुडणे- कर्जबाजारी होणे, डबघाईला येणे.
- चेहरा खुलने- आनंदित होणे.
- चेहरा पडणे- लाज वाटणे, खजील होणे.
- छाती दडपणे- घाबरून जाणे.
- जिभेला हाड नसणे- वाटेल ते बोलणे.
- जीव की प्राण असणे- अत्यंत प्रिय असणे.
- डोक्यावर खापर फोडणे- निर्दोष माणसावर दोष टाकणे.
- डोक्यावर बसवणे- फाजील लाड करणे.
- डोळा असणे- नजर/पाळत ठेवणे.
- डोळा लागणे- झोप येणे.
- डोळे उघडणे-अनुभवाने सावध होणे.
- डोळेझाक करणे- दुर्लक्ष करणे.
- डोळे निवणे- समाधान होणे.
- डोळे पांढरे होणे- धक्कादायक प्रसंग निर्माण होणे.
- डोळ्यात अंजन घालणे- चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
- .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏