मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

दोन विलायची... उत्तम आरोग्य

 *रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त दोन विलायची :-*

*सकाळी पाहा याचे कमाल :-* 


विलायची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो. विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. यामध्ये आयरन आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन सी आणि नियासिन देखील असते. हे रेड ब्लड सेल्स निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. विलायची खाण्याचे अनेक फायदे आहेत. आज आपण पाहुया विलायची खाल्ल्याने होणा-या काही फायद्यांविषयी 


*१ } पचनक्रिया सुरळीत करते.* 


◼️जेवणानंतर अनेक लोक विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात करतात. कारण, विलायची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते. 

◼️विलायची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातीतील जळजळ संपवण्याचे काम करते.

◼️आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे विलायची पचनक्रियेत मदत करते. जर तुम्हाला अपचनाची समस्या आहे तर रात्री दोन विलायची, अद्रकचा छोटा तुकडा, थोडीशी लवंग आणि धने बारीक करा. हे पावडर गरम पाण्यासोबत घ्या. पोटासंबंधीत सर्व समस्या दूर होतील.


*२ } श्वासाची दुर्गंधी दूर होते.* 


◼️ विलायचीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुण असतात. 

◼️यासोबतच विलायचीची तिखट चव आणि सुगंध श्वासांची दुर्गंधी दूर करते. ही डायजेस्टिव्हला मजबूत करते. 

◼️रोज जेवण केल्यानंतर एक विलायची खा किंवा रोज सकाळी विलायचीची चहा प्या.


*३ } ॲसिडिटीपासुन आराम* 


◼️विलायचीमध्ये उपलब्ध असलेले तेल ॲसिडिटीला नष्ट करते. विलायची चावल्यानंतर त्यामधून अनेक प्रकारचे 

तेल बाहेर पडतात. जे तुमच्या लाळ ग्रंथींना उत्तेजित करतात. यामुळे तुमचे पोट चांगल्या प्रकारे कार्य करते. विलायची खाल्लावर त्यामधील तेल गारवा देते. यामुळेच विलायची चावल्यावर होणारी ॲसिडिटीची जळजळ दूर होते. 


*४ } फुफूसांसंबंधीत आजारांचा नैसर्गिक इलाज :-* 


◼️विलायची दमा, खोकला, सर्दी आणि फुफूसांसंबंधीत आजारांपासुन आराम देते. आयुर्वेदात इलायचीला एक गरम मसाला मानले जाते. ही शरीराला आतुन गरम ठेवते. विलायचीचे सेवन केल्याने कफ बाहेर पडतो. सर्दी, खोकला किंवा छातीत कफ असेल तर विलायचीचे सेवन केल्याने या समस्या दूर होतात. जर तुम्हाला सर्दी झाली तर वाफ घेताना गरम पाण्याच्या भांड्यात थोडेसे विलायची तेल टाका.


*५ } एनीमियापासून वाचवते.* 


◼️एक ग्लास गरम दूधामध्ये एक-दोन चिमुट विलायची पावडर टाका. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर देखील टाकू शकता. एनीमियाचे लक्षण आणि अशक्तपणापासुन आराम मिळवण्यासाठी हे रात्री प्या.


*६ } कँसरपासून बचावते :-* 


विलायची मॅगनीजचे एक प्रमुख स्त्रोत आहे. मॅगनीज एंजाइमच्या स्रावमध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. हे फ्री रॅडिकल्सला नष्ट करते. याव्यतिरिक्त विलायचीमध्ये शरीरातुन विषारीतत्त्व बाहेर काढण्याचे गुण असतात.

ही कँसरपासुन वाचवण्याचे देखील काम करते.


*७ } हृदयाची गती नियमित करते.* 


◼️ विलायची पोटॅशियम, कॅल्शियमसारख्या खनिजांनी परिपूर्ण असते. यामुळे ही शरीरातील इलेस्ट्रोलिसिस प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावते. विलायची हृदयाची गती नियमित करण्यात मदत करते. सोबतच विलायची ब्लडप्रेशरला नियंत्रित करते. यामुळे जर तुम्ही आपल्या हार्टला नेहमी हेल्दी ठेवू इच्छिता तर नियमित विलायचीचे सेवन करा किंवा विलायचीची चहा पिण्यास सुरुवात करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट