मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

लठ्ठपणा... समस्या उपाय

 *लठ्ठपणा*


लठ्ठपणा ही समस्या कमी आणि आजार जास्त वाटू लागला आहे. कारण दर २ माणसांमागे एका माणसाचं एकतर पोट सुटलेलं असतंच. हळूहळू हा लठ्ठपणा एव्हढा वाढतो की अगदी जिवावर सुध्दा बेततो. ही समस्या आजच्या काळातील सामान्य समस्यांपैकी एक आहे. या समस्येचं मूळ कारण आहे ते असंतुलित जीवनशैली. पण काही प्रकरणांमध्ये, लठ्ठपणा हा मेडिकल कंडीशन मूळे असू शकतो

आपल्या शरीरात गरजेपेक्षा जास्त चरबी जमा झाली की आरोग्याची वाट लागली म्हणून समजाच. म्हणून आजकाल लोक बारीक सारीक राहण्यकडे जास्त लक्ष देतात.  पण त्यातही चुका करतात आणि मग काय..? मग आहे त्याहून अधिक लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. कधी कधी कमी वयातच हा लठ्ठपणा जडतो आणि वयाप्रमाणे वाढत जातो. जणू काही वर्गमित्रच. त्यामूळे एकतर योग्य वयात लठ्ठपणावर नियंत्रण मिळवा आणि वजन कमी करताना चुका करू नका.

वजन जितकं झपाट्याने वाढत तितक्या झपाट्याने कमी होत नाही हे एक सार्वजनिक दुःख आहे. वजन कमी होण्यासाठी बराच काळ मेहनत करावी लागते. त्यात जर मेडिकल कंडीशन मूळे लठ्ठपणा असेल तर आणखी कठीण परिश्रम घ्यावे लागतात. अशावेळी मुख्य करून वेलनेस कोच च्या टीप्स वर पूर्ण फोकस ठेवा.

1. कितीही खा, काहीही खा पण कॅलरी वाढू देऊ नका -

बहुतेक लोकांना वाटतं की आपण काहीही नाही सगळं काही खाऊ शकतो. या नादात ते अनेकदा कॅलरीची मर्यादा पार करतात आणि त्यांना कळतही नाही. तर मित्रांनो, असं कसं चालेल बरं..? जोपर्यंत तुम्ही कॅलरीची मर्यादा ओलांडणे बंद करत नाही तोपर्यंत तुमचं वजन आटोक्यात येणं अशक्य आहे. त्यामुळे पॅक्ड फूड्स, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कमी पौष्टिक पदार्थ आपल्या आहारातून वगळणे आवश्यक आहे.

अधिक प्रक्रिया केलेले पदार्थ पेशींचे वय गतीने वाढवतात. कारण यामध्ये हायड्रोजनेटेड तेल जास्त प्रमाणात असतात. हे ट्रान्स फॅट्सने भरलेले असल्यामुळे शरीरातील सूज वाढवतात. यामुळे पेशी खराब होण्याची शक्यता वाढते.

2. नुसतं प्रोटिन खाऊ नका –

साधारणपणे वाढते वजन रोखण्यासाठी प्रामुख्याने आहारात अधिक प्रोटीन खाल्ले जाते. जे अत्यंत चुकीचे आहे. वाढत्या वजनाचा संबंध हा तुम्ही खात असलेल्या कॅलरीजशी असतो. त्यामुळे पुरेसे प्रोटिन घेत घेतल्याची खात्री करणे आवश्यक असते. शिवाय आपले वजन कमी करण्यासोबतच प्रथिनांची कमतरता हे वय वाढण्याचेही मुख्य कारण ठरते. जास्त प्रमाणात प्रोटिनचे सेवन केल्याने शरीर बारीक राहण्यास मदत होते. पण प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंचे नुकसान होते आणि परिणामी चयापचय शक्ती लोप पावते. यामुळे हाडांचे नुकसान होते. त्यामुळे बारीक होण्यासाठी फक्त प्रोटीन खाऊ नका.

3. खाण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करा –

आपल्या आहारात नुसतं प्रोटीन किंवा नुसतं कॅल्शिअम असेल तर कसं चालेल..? अनेक लोक बारीक होण्यासाठी फक्त फळं किंवा फळांचा ज्यूस एव्हढाच आहार घेतात. याशिवाय शेक किंवा प्रोटीन बारसारखे खाद्यपदार्थदेखील आहारात समाविष्ट करतात. तर असे पदार्थ कधीतरी खाण्यावर भर द्या. याचे कारण म्हणजे, अनेक उत्पादने अत्यंत प्रक्रिया केलेली असतात आणि त्यात साखर भरपूर असते. जास्त साखर दीर्घकालीन रोगाच्या विकासास कारणीभूत ठरते आणि म्हातारपणाकडे वेगाने नेते.


*वजन कमी करण्याची पंचःसूत्री....* 


1) जास्त कॕलरीचा आहार टाळा व कमी कॕलरीचा आहार घ्या. शिवाय तीन वेळा जेवत असाल तर कोणत्याही दोन वेळच्या जेवणांमध्ये 3 ते 4 तासांचे अंतर ठेवा.


2) सकाळी 5 ते 7 या वेळेत किमान एक तास सलग व्यायाम करा. कारण पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये ग्लुकोज (साखर) जळते व नंतरच्या 40-45 मिनिटांत फॕट (चरबी) जळते तेव्हा घाम येत राहतो.


3) नेहमी गरम पाणी प्या. दर तासातासाला एक ग्लास अशा पद्धतीने दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्या.


4) रात्री हलका आहार घ्या, कमी आहार घ्या. रात्री उशीरा केलेल्या जेवणामुळे फॕट वाढते त्यामुळे शक्य तेवढे लवकर सातच्या आसपास जेवण करा. तसेच रात्री आहार घेतल्यानंतर शतपावली करा व जेवणाच्या वेळेपासून दोन तासांनी एक ग्लास कोमट पाणी पिऊन झोपी जा.


5) दिवसातून फक्त दोनच वेळा जेवणे. सकाळी 9 च्या आसपास व संध्याकाळी 7 च्या आसपास. अधूनमधून फक्त पाणी किंवा ताक पित राहणे.


असे करण्याने तुमचे वजन नियंत्रणात येईल व ही सवय कायमस्वरुपी लावल्यास वजन सदैव नियंत्रणात ही राहील.


ज्याचे वजन थोडेफार वाढले आहे ते कमी करायचे आहे व ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनी वरील चतूःसूत्रीचे पालन केल्यास उत्तम फायदा मिळतो. मात्र ज्यांचे वजन जास्तच आहे त्यांनी 3 ते 6 महिन्यांसाठी 100% हर्बल (Meal Replacement) ट्रीटमेंट घेणे व दिनचर्येत योग्य तो बदल करणे आवश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट