एक कावळा तहानेने व्याकूळ होऊन पाणी शोधत असताना एक सुरई त्याला दिसली. पाणी फारच थोडे होते व ते अगदी तळाशी होते. त्याने आपली चोच आत घालून पाहिली, पण पाण्यापर्यंत पोहोचत नव्हती. त्याने खूप प्रयत्न केले पण पाण्याचा एक थेंबही त्याला मिळाला नाही. शेवटी त्याने बरेच खडे जमा केले व ते सुरईत टाकले. तेव्हा त्याची चोच पोहोचण्याइतके पाणी वर आले व त्याने ते पिऊन आपली तहान भागवली.
तात्पर्य : शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏