मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

दालचिनी

 *दालचिनी अतिशय गुणकारी मसाला आहे. अनेक प्रकारच्या व्याधी बऱ्या  करते. बघुया तर फायदे.. 👇*


१) दालचिनी, मिरेपुड व मध हे मिश्रण जेवल्यानंतर घेतल्यास पोट फुगत नाही, व अन्नाचे नीट पचन होते. गोवरप्रतिबंधक म्हणून दालचिनी वापरली जाते.


२) थंडीमूळे डोके दुखत असेल तर दालचिनी पाण्यात वाटुन लेप मस्तकाला लावा. वेदना कमी होतात.


३) जखमा बऱ्या  करते : दालचीनी व मध एकत्र करून जिथे जखम झाली आहे तिथे लावल्यास जखम बरी होते, कारण हे एंटिबँक्टेरिअल आहे.


४) चेहरा सुंदर करते : दालचिनी पावडर , दही, केळ, व लिंबाचा रस एकत्रीत करून हि पेस्ट चेहऱ्याला वीस मिनिटे लावून ठेवा व नंतर धूवा. रक्ताभिसरण झाल्यामूळे त्वचा चमकते व चेहरा सुंदर दिसतो.


५) ओठ लालबुंद  होतात :  एका जारमध्ये  दालचिनीच्या २-३ काड्या, आँलिव्ह आँईल मिसळून ठेवा, चार पाच दिवसात याचा रंग तेलात उतरेल.

मग रोज रात्री झोपतांना हे तेल ओठांना चोळून लावा. काही दिवसातच काळसरपणा जाऊन ओठ सुंदर लालचुटुक होतात.


६) दातदुखी : दालचिनीची पावडर करून त्यात मध मिसळून याने हिरड्या व दात अश्या दोन्ही ठिकाणी मंजन करावे, दंतदुखी, पायरिया, किड, जिंजिवाईटिस, असे सर्व आजार दूर होऊन दात बळकट होतात.


७) संधिवात, सांधेदुखी :  दालचिनीच्या तेलाने दुखऱ्या  जागेवर मसाज केल्यास तिथले दुःख दूर होते व शिरा मोकळ्या होतात.


८) कोलेस्ट्रोल कमी करते :  याच्या सेवनाने रक्तातल्या गुठळ्या तसेच अतिरिक्त चरबी वितळून रक्तप्रवाह सुरळित चालतो. अनुषंगाने ह्दयाचे कोणतेच विकार होत नाहीत व कोलेस्ट्रोल बँड तयार होत नाही.


९) मासिक धर्म :  दालचिनी पावडर पाण्यात ऊकळवून मग त्यात मध मिसळून हे पाणी दिवसभर घ्यावे. पाळीत होणारा अतिरिक्त रक्तस्राव, कंबरदुखी, पायात पेटके येणे हे सर्व त्रास बंद होतात.


१०) लठ्ठपणा, ओबिसिटी दूर होते : दालचिनी एक एंटी- ऑक्सिडेंट आहे. पाँलिफेनोलीस मूळे लठ्ठ लोकात असलेला ऑक्सिडेंटीव स्ट्रेस कमी करतो. शरीरातला मेद जाळते व हळूहळू वजन कमी होते.


११) सर्दी, खोकला, दमा, अस्थमा :  एक ग्लास पाण्यात एक चमचा दालचिनी पावडर, दोन लवंगा,  टाकुन उकळवा व हा काढा थोडा थोडा घेत राहा. श्वसनाचे सर्व आजार बरे होतात.


१२) मधुमेह :  दालचीनीत असलेले पाँलिफेनाल्स शरीरातील इंसूलिनची मात्रा योग्य ठेवते व त्यामूळे मधुमेह आटोक्यात राहतो. रोज अर्धा छोटा चमचा दालचिनी पावडर मधात मिसळून घ्या.


१३) कानदुखी व बहिरेपणा :  दालचिनी व मध एकत्रीत घेतल्याने कानदुखी, बहिरेपणा दूर होतो. याच्या तेलाचे एक दोन थेंब कानात टाकल्यास कानातले सर्व प्रकारचे संक्रमण दूर होते.

              

१४) केसांचे आरोग्य :  दालचिनी पावडर एक चमचा, एक चमचा मध व थोडे आँलिव्ह आँईल एकत्रीत करून केसांची मालीश करावी याने केस गळणे थांबते. टक्कल सुध्दा जाते. तिथे केस येतात.


१५) कँसर : एक महिना जर दालचिनिचा काढा मध मिसळून घेतल्यास कँसरच्या पेशींची वाढ बंद होते व नविन चांगल्या पेशी वाढतात.


१६) जुलाब, डायरीया : एक चमचा दालचिनी पावडर,अद्रक किसून, जिरेपुड एक चमचा, व  ४ चमचे मध असे मिश्रण बनवा. दिवसातून ३ वेळा घ्या. सर्व त्रास थांबतात. तसेच उलटी, मळमळ  होत असेल तर दालचीनी व  मध एकत्रीत करून ते चाटण घ्यावे.


वरील सर्व फायदे बघता दालचिनी ही  स्वयंपाकघरातली महौषधीच आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट