- अंग राखून काम करणारा – अंगचोर
- अकस्मात घडून आलेला बदल – क्रांती
- अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी – आदिवासी
- अतिशय उंच असलेला – अत्युच्च
- अतिशय नाजुक – तोळामासा
- अनुभव नसलेला – अननुभवी
- अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
- अनेकांमधून निवडलेले – निवड
- अन्न देणारा -अन्नदाता
- अपत्य नसणारा – निपुत्रिक
- अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट – अनपेक्षित
- आधी जन्म घेतलेला अग्रज
- मागून जन्मलेला अनुज
- अरण्याचा राजा – वनराज
- अरण्याची शोभा – वनश्री
- अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
- आईवडील नसलेला – पोरका
- आकाशात गमन करणारा – खग
- आकाशातील ताऱ्यांचा पट्टा – आकाशगंगा
- आग विझवणारे यंत्र – अग्निशामक यंत्र
- आधुनिक विचारांचा दृष्टिकोण असणारा – पुरोगामी
- आपल्या लहरी प्रमाणे वागणारा – स्वच्छंदी
- आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा – खेळगडी
- आवरता येणार नाही असे – अनावर
- इच्छीलेली वस्तू देणारी गाय – कामधेनू.
- इतरांच्या आधारावर जगणारा – आश्रित
- इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन – वतन
- ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
- ईश्वर नाही असे मानणारा – नास्तिक
- उंचावरुन कोसळणारा पाणलोट – धबधबा
- उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा
- उदयाला येत असलेला – उदयोन्मुख
- एक देश सोडून दुसऱ्या देशी जाणे – देशांतर
- एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे – एकेश्वरी
- एकाच गोष्टीचा नाद करणारा – नादिष्ट
- एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे – अन्योक्ती
- एखाद्या गोष्टीची उणीव असलेली स्थिति – अभाव
- ऐकण्यास गोड लागणारे – कर्णमधुर
- ऐकायला व बोलायला न येणारा – मूकबधिर
- कथा लिहिणारा – कथाकार,कथालेखक
- कथा सांगणारा – कथेकरी
- कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
- कधीही नाश न पावणारा – अविनाशी
- कधीही नाश न पावणारे – अविनाशी
- कमी आयुष्य असलेला – अल्पायू,अल्पायुषी
- कमी वेळ टिकणारा – अल्पजीवी,क्षणभंगुर
- कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असणारा – कर्तव्यदक्ष
- कर्तव्याकडे पाठ फिरवणारा – कर्तव्यपराङमुख
- कल्पना नसताना आलेले संकट – घाला
- कविता करणारा / रचणारा – कवी
- कविता करणारी – कवयित्री
- कशाचीही भीती नसणारा – निर्भय
- कष्ट करून जगणारा,श्रमांवर जगणारा – श्रमजीवी,कष्टकरी
- कष्ट करून जगणारे – कष्टकरी
- कसलीच इच्छा नसलेला – निरिच्छ
- कसलीही अपेक्षा नसणारा – निरपेक्ष
- कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा – दिवटी
- कार्य करण्यास सक्षम असलेला – कार्यक्षम
- किल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट
- कुंजात विहार करणारा – कुंजविहारी
- कुस्ती खेळण्याची जागा – हौद,आखाडा
- केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
- केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
- केवळ धर्मभेद करणारा – धर्मांध
- कैदी ठेवण्याची जागा – कारागृह,बंदिशाळा,तुरुंग
- कोणाचाही आधार नाही असा – अनाथ
- कोणाच्याही पक्षात सामील न होणारा – अपक्ष
- खूप आयुष्य असलेला – दीर्घायू,दीर्घायुषी
- खूप दानधर्म करणारा – दानशूर
- खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
- खूप मोठा विस्तार असलेले – ऐसपैस,विस्तीर्ण
- गाईसाठी काढून ठेवलेला घास – गोग्रास
- गाडीच्या चाकांनी पडलेली वाट – चाकोरी
- गाणे गाणारा – गायक
- गावच्या कामकाजाची जागा – चावडी
- गावाचा कारभार – गावगाडा
- गावाभोवतालचा तट – गावकूस
- गुणांची कदर करणारा – गुणग्राहक
- गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा – वावटळ
- ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर – प्रक्षिप्त
- घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
- घरदार नसलेला -उपऱ्या
- घरी पाहुणा म्हणून आलेला – अतिथि
- घोडे बांधायची जागा – पागा,तबेला
- चंद्रापासून येणारा प्रकाश – चांदणे
- चंद्राप्रमाणे मुख असणारी – चंद्रमुखी
- चरित्र लिहिणारा – चरित्रकार
- चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुद्धपक्ष,शुक्लपक्ष
- चार पाय असणारे – चतुष्पाद
- चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चव्हाट
- चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक,चवाठा
- चार वेदांमध्ये पारंगत असणारा – चतुर्वेदी
- चारही बाजूला पाणी असलेला भूप्रदेश – बेट
- चिखलात उगवलेले कमळ – पंकज
- ****
- चित्रे काढणारा – चित्रकार
- चिरकाल जगणारा – चिरंजीवी
- जगाचा नाश होण्याची वेळ – प्रलयकाळ
- जमिनीचे दान – भूदान
- जमिनीतून पाझरून निघणारा झरा – उपळी
- जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर
- जमीन व पाणी अशा दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी – उभयचर
- जमीनीखालचा गुप्त मार्ग – भुयार
- जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा – दिपस्तंभ
- जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
- जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी – कमलाक्षी
- जिवंत असेपर्यन्त -आजन्म
- जिवाला जीव देणारा – जिवलग
- जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी
- जे साध्य करावयाचे आहे ते – ध्येय
- ज्याचा तळ लागत नाही ज्याचा थांग लागत नाही असा – अथांग
- ज्याचा विवाह झाला नाही असा – अविवाहित
- ज्याचा विसर पडणार नाही असा – अविस्मरणीय
- ज्याची किंमत होऊ शकत नाही असे – अनमोल
- ज्याचे हात गुढघ्यापर्यन्त लांब आहेत असा – आजानुबाहू
- ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि,चक्रधर
- ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा – उपकृत
- ज्याला आईवडील नाहीत असा – पोरका,अनाथ
- ज्याला आकार नाही असा – निराकार
- ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा – अजर
- ज्याला कधीही वीट नाही असे – अवीट
- ज्याला काशाचीच उपमा देता येणार नाही असे- अनुपम
- ज्याला कोणीही शत्रू नाही असा – अजातशत्रू
- ज्याला मरण नाही असा – अमर
- ज्याला लाज नाही असा – निर्लज्ज
- ज्याला सीमा नाही असे – असीम
- ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य
- ज्यास कोणीही शत्रू नाही असा – आजातशत्र
- ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
- ठरावीक काळानंतर प्रसिद्ध होणारे – नियतकालिक
- डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता – बोगदा
- डोंगरकपारीत राहणारे लोक – गिरिजन
- डोक्यावर ओझे वाहून नेणारा – माथाडी
- ढगांनी भरलेले – ढगाळलेले,अभ्राच्छादित
- तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख – ताम्रपट
- तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण – तिठा
- तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय
- तोंडावर स्तुती करण्याचा गुण – तोंडपुजेपणा
- त्वरित कृती करणारा – जहाल
- थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुष्ट
- थोड्यावर संतुष्ट असणारा – अल्पसंतुष्ट
- थोरांनी लहानांच्या प्रति व्यक्त केलेली सदिच्छा – आशीर्वाद
- दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
- दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार
- दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
- दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
- दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
- दर महिन्याला प्रसिद्ध होणारे – मासिक
- दर वर्षाला,वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे – वार्षिक
- दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – षण्मासिक
- दररोज ठरलेला कार्यक्रम – दिनक्रम
- दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
- दारावरील पहारेकरी – द्वारपाल,दारवान
- दुष्काळात सापडलेले लोक – दुष्काळग्रस्त
- दुसऱ्याचे दु:ख पाहून कळवळणारा
- दुसऱ्याच्या मनातील जाणणारा – मनकवडा
- दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा – उदार,दिलदार
- दुसऱ्यावर अवलंबून असलेला – परावलंबी
- दुसऱ्यावर अवलंबून नसलेला – स्वावलंबी
- दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
- देव आहे असे मानणारा – आस्तिक
- देवलोकातील सुंदर स्त्रिया – अप्सरा
- देवापुढे सतत जळणारा दिवा -नंदादीप
- देशाची सेवा करणारा – देशसेवक
- दोन थड्या भरून वाहणारी नदी – दुथडी
- दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण – संगम
- दोन नद्यांमधील जागा – दुआब
- धान्य साठवण्याची जागा – कोठार
- न कळण्यासारखे – अनाकलनीय
- 168.न टाळता येणारे – अपरिहार्य
- नऊ दिवस टिकणारा ताप – नवज्वर
- नदीची सुरुवात होते ती जागा – उगम
- नदीतील खोलगट भागातील खोल पाणी – डोह.नवऱ्या मुलाचा बाप – वरबाप
- नवीन मतांचा पुरस्कार करणारा - नवमतवादी
- नसलेली गोष्ट आहे असे वाटणे – आभास
- नाटक लिहिणारा – नाटककार
- नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत – नांदी
- नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा – नट,अभिनेता
- नाणी तयार करण्याचा कारखाना – टंकसाळ
- नावाचा एकसारखा उच्चार – घोष
- निरर्थक गोष्टी किंवा गप्पा – भाकडकथा
- निराश्रितांचा सांभाळ करणारी संस्था – अनाथाश्रम
- नेत्याचे अनुकरण करणारे – अनुयायी
- नेहमी खोडी काढणारा – खट्टयाळ
- नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
- पडक्या घराची मोकळी जागा – बखळ
- पडदा दूर करणे – अनावरण
- पतीचा भाऊ – दीर
- पहाटेपूर्वीची वेळ – उष:काल
- पाऊस मुळीच न पडणे -अवर्षण , अनावृष्टी
- पाच वडांचा समूदाय असलेली जागा – पंचवटी
- पाण्याखालून चालणारी बोट – पाणबुडी
- पाण्यात राहणारे प्राणी – जलचर
- पायात जोडे न घातलेला – अनवाणी
- पायात पादत्राणे न घालता – अनवाणी
- पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
- पायी जाणारा – पादचारी
- पाहण्यायोग्य अनेक वस्तू मांडलेली जागा – प्रदर्शन
- पाहण्यासाठी आलेले लोक – प्रेक्षक
- पिकांच्या दोन ओळींतील अंतर – पाथगी
- पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ – पेय
- पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक – पूरग्रस्त
- पूर्वी कधीही घडले नाही असे – अभूतपूर्व
- पूर्वी कधीही न ऐकलेले – अश्रुतपूर्व
- पूर्वी कधीही न घडलेले – अभूतपूर्व
- पूर्वी जन्मलेला – पूर्वज
- प्रेरणा देणारा – प्रेरक
- फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त,अन्नछत्र
- बसगाड्या थांबण्याची जागा – बस-स्थानक
- बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर
- बातमी सांगणारा/सांगणारी – वृत्तनिवेदक /वृत्तनिवेदिका
- बालकांपासून वृद्धांपर्यन्त सर्वजण – आबालवृद्ध
- बिनचूक वजनाचा काटा – धारवाडी काटा
- भांडण उकरून काढणारा – भांडकुदळ
- भाकरी करण्याची लाकडी परात – काठवत
- भाषण ऐकणारे – श्रोते
- भाषण करणारा – वक्ता
- मडकी बनवणारा -कुंभार
- मन/चित्त आकर्षित करणारा – मनोहर,चित्ताकर्षक,मनोवेधक चित्तवेधक
- मनाला आल्हाद देणारा – आल्हाददायक
- मरण येईपर्यंत – आमरण
- मशाल धरणारा नोकर – मशालजी
- माकडाचा खेळ करून दाखवणारा – मदारी
- मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक – चित्रगुप्त
- मालाचा साठा करून ठेवण्याची जागा – गुदाम,कोठार,वखार
- मासे पकडणारा – कोळी
- मुद्द्याला धरून असलेले – मुद्देसूद
- मूर्ती बनवणारा – मूर्तिकार
- मूर्तीची तोडफोड करणारा – मूर्तिभंजक
- मूर्तीची पूजा करणारा – मूर्तिपूजक
- मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
- मोजता येणार नाही असे – अगणित,असंख्य
- मोठ्याने केलेले पाठांतर – घोकंपट्टी
- मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण – अन्नछत्र
- म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार – म्हातारचळ
- यज्ञ करण्याची ठराविक जागा – यज्ञसूकर
- योजना आखणारा – योजक
- रक्षण करणारा – रक्षक
- रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
- राजाची स्तुती करणारा – भाट
- राज्यातील लोक – प्रजाजन,रयत,प्रजा
- रात्री फिरणारा – निशाचर
- रात्रीचा पहारेकरी – जागल्या
- रिकामा हिंडणारा – टवाळखोर
- रोग्याची शुश्रूषा करणारी – परिचारिका
- लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर – माहेर
- लग्नात द्यावयाची भेट – आहेर
- लग्नासाठी जमलेले लोक – वऱ्हाडी
- लढण्याची विद्या – युद्धकला
- लहान मुलाला झोपण्यासाठी गायिलेले गाणे – अंगाईगीत
- लाखो रुपयाचा धनी – लक्षाधीश
- लिहिता – वाचता येणारा – साक्षर
- लिहिता वाचता न येणारा – निरक्षर
- लोकांचा आवडता – लोकप्रिय
- लोकांचे नेतृत्व करणारा – लोकनायक
- लोकांचे पुढारीपण करणारा – पुढारी
- लोकांच्या मदतीने चाललेले राज्य – प्रजासत्ताक
- लोकांनी मान्यता दिलेला – लोकमान्य
- वनात राहणारे प्राणी – वनचर
- वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय
- वाडवडिलांकडून मिळालेली – वाडीलोपार्जित
- वारस नसलेला – बेवरसी
- विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण – पाणपोई
- .विमान चालवणारा – वैमानिक
- विविध बाबींत प्रवीण असलेला – अष्टपैलू
- विषयाला सोडून बोलणे – अप्रस्तुत
- व्याख्यान देणारा – व्याख्याता
- शत्रूकडील बातमी काढणारा – हेर
- शत्रूला सामील झालेला – फितूर
- शापापासून सुटका – उ:शाप
- शिकारीसाठी उंच बांधलेला माळा – मचाण
- ****
- शिल्लक राहिलेले – उर्वरित
- शोध लावणारा – संशोधक
- श्रम न करता खाणारा -ऐतोबा
- श्रेष्ठ ऋषि – महर्षी
- संकट दूर करणारा – विघ्नहर्ता
- संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
- सतत उद्योगशील असणारा – उद्यमशील
- सतत एकटे राहण्याची आवड असलेला – एकलकोंडा
- सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
- .सतत कोसळणारा पाऊस – झड
- सतत निंदानालस्ती करणारा – निंदक
- सतत पैसा खर्च करणारा – उधळ्या
- समाजाची सेवा करणारा – समाजसेवक
- .सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
- .सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
- सर्व दिशांना पांगलेले – दिगंतर
- सर्वात शेवटी जन्मलेला -अनुज
- साक्षात्कार झालेला – द्रष्टा
- सापांचा खेळ करणारा – गारुडी
- सिनेमाच्या कथा लिहिणारा – पटकथा लेखक
- सुखाच्या मागे लागलेला – सुखलोलुप
- सूचना न देता येणारा – अतिथि
- सूर्याचे उत्तरेकडे सरकणे – उत्तरायण
- सैन्याची चक्राकार केलेली रचना – चक्रव्यूह
- स्तुती गाणारा – भाट
- स्वच्छ,गार पाणी ठेवण्याची जागा – आबदारखना
- स्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
- स्वतः संपादन केलेली – स्वार्जित,स्वसंपादित
- स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र – आत्मवृत
- स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा – सांगकाम्या
- स्वतःच्या फायद्याचे पाहणारा – अप्पलपोटा
- स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा – स्वार्थी
- स्वतःबद्दल अभिमान असलेला – स्वाभिमानी
- स्वतःबद्दल अभिमान नसलेला – स्वाभिमानशून्य
- स्वदेशाचा अभिमान असणारा – स्वदेशाभिमानी
- स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
- हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत
- .हत्तीला वश करण्याचे साधन – अंकुश
- हरिणासारखे डोळे असणारी – मृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना
- हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्रांती
- हिंडून करायचा पहारा – गस्त
- हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत – आसेतुहिमाचल
- होडी चालवणारा – नावाडी,नाखवा,नाविक
- स्वतःचा अजिबात अभिमान नसलेला स्वाभिमान शून्य
- दुसऱ्याच्या हिताची काळजी करणारे -हितचिंतक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏