राज्यातील इ.९ ते इ.१२ वीच्या विद्यार्थ्यांना विविध करिअर, शिष्यवृत्ती, कोर्सेस यांची सर्वंकष माहिती या महाराष्ट्र करिअर पोर्टलवर देण्यात आली आहे. करिअर निवडताना आधुनिक अभ्यासक्रमांची अत्यंत उपयुक्त माहिती ‘महा करिअर पोर्टल’ च्या माध्यमातून एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना याचा अधिक फायदा होईल. या पोर्टलचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी केलं.
विद्यार्थी मित्रांनो, आपला विद्यार्थी सरल आयडी व पासवर्ड याचा वापर करून आपण महाराष्ट्र करिअर पोर्टलमध्ये प्रवेश करू शकता. हे करिअर पोर्टल आपणास करिअरविषयक माहिती, विविध व्यावसायिक कोर्सेस, अनेक शिष्यवृत्या, महाविद्यालये शोधण्यास मदत करेल. आपणास आपला विद्यार्थी सरल आयडी माहित नसल्यास कृपया आपल्या शिक्षकांशी किंवा मुख्याध्यापक/ प्राचार्य यांच्याशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏