देशातील 11 राज्यांचे स्वत:चे गीत आहे. जय जय महाराष्ट्र गीताला मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्राचाही या राज्यांच्या पंक्तीत समावेश झाला. हे गीतकवी राजा बडे यांनी लिहिले असून श्रीनिवास खळे यांनी संगीत दिले आहे. तर, शाहीर साबळे यांनी हे गीत गायलं आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं त्यावेळी मुंबईतल्या दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या समारंभात राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते. यावेळी शाहीर साबळे यांनी हे गीत सादर केले होते.🙏🙏
महाराष्ट्र गीत गायन कालावधीत 1.41 मिनिटे.
ऑडिओ स्वरूपात MP3 download करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://drive.google.com/file/d/15ahCMoHkJLOaTFbrc7Oy4cYGc3Hggufl/view?usp=drivesdk
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://drive.google.com/file/d/1hE4au-rwIvuuCeJuchaLAG2tuEzO52Vo/view?usp=drivesdk
राज्यगीत
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
भिती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिव शंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥१॥
काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीव घेणी दारिद्रयाच्या उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा 'महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ॥२॥
महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यगीत :- जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
31 जानेवारी 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून दर्जा देण्यास मान्यता मिळाली आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023 पासून हे गीत महाराष्ट्र राज्याचे अधिकृत राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात येणार आहे.
* राज्य गीताबद्दल माहिती :-
गीतकार :- राजा नीलकंठ बढे
गायक :- शाहीर साबळे
संगीतकार :- श्रीनिवास खळे
👌👌👍👍
उत्तर द्याहटवा