*व्हिटॅमिन सी’चा स्त्रोत ‘लिंबू’, रोगप्रतिकारक शक्तीसह अनेक समस्यांवर गुणकारी !*
*लिंबू आणि लिंबाच्या साली वापर करण्यासाठी काही टिप्स*
1- लिंबू कापून त्यावर खडीसाखर घालून चोखल्यास ओकारी थांबते. पोटदुखी थांबण्यास आले व लिंबाचा रस साखर घालून सेवन करावा.
2-अजीर्ण झाल्यास लिंबू कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव मीठ घालून कोमट करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.
3- पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत प्यावे. त्याने भूक वाढते आणि अन्न नीट पचते.
4 -आरोग्य व सौंदर्य रक्षणासाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून त्याने चेहरा धुवावा. कांती तेजस्वी होते आणि सुरकुत्या नाहीशा होतात. त्वचेचा रुक्षपणा निघून जातो.
5- रस काढल्यानंतर लिंबाची साल फेकून देवू नये. ती चेहऱ्यावर दोन्ही हातांनी नाजूकपणे घासावी. असे केल्याने रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि सौंदर्य खुलते.
6 -लिंबाच्या सालीमध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमापासून बचाव होतो.
7 - गुडघे, कोपर काळवंडले असतील तर थोडा मध लावून लिंबाच्या सालीने त्या भागावर मसाज करावा. काळवंडलेपणा निघून जातो.
8 - लिंबाच्या सालीने पायाची, हाताची नखे साफ घासल्याने, ती स्वच्छ होतात आणि त्यांना चकाकीही येते.
9 -फ्रिजमध्ये दुर्गंधी येत असेल तर, लिंबाच्या साली ठेवाव्या. यामुळे दुर्गंधी कमी होते.
10 -शेगडीवरचे चिकट, तेलकट डाग काढण्यासाठीही लिंबाची साल उपयोगी पडते.
11- लिंबाच्या सालीचा किस हा ‘लेमन झेस्ट’ म्हणून ओळखला जातो. सॅलेड किंवा अनेक पदार्थांमध्ये स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही ‘लेमन झेस्ट’चा वापर करू शकता.
12 - लिंबाची साल वाळवून त्याची पावडर करून फेसपॅकमध्ये तिचा वापर करू शकता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏