विराम चिन्हांचा वापर भावनांच्या,विचारांच्या आविष्कारासाठी आवश्यक व महत्त्वाचा ठरतो. भाषा व्यवहारात लेखन, भाषण , वाचन या क्रिया सतत व सातत्याने घडत असतात. जेव्हा आपण लेखन करतो तेव्हा कथन केलेले वाचकांच्या लक्षात यावे म्हणून विरामचिन्हांचा वापर केला जातो. कोणताही मजकूर वाचत असताना लिहलेला अर्थ लक्षात घेऊन आपण थांबतो. या थांबण्याला विराम घेणे असे म्हणतात. हा विराम कधी अल्प असतो तर कधी त्यापेक्षा अधिक असतो. कधी एखादे वाक्य बोलनाऱ्या व्यक्तीच्या मुखातील असतो.
बोलताना किंवा लिहिताना अर्थ नीट लक्षात यावा म्हणून शब्द व वाक्ये यांमध्ये काही काळ थांबावे लागते. कोठे किती थांबावे, हे ध्यानात येण्यासाठी जी विशिष्ट चिन्हे वापरतात, तीच विराम चिन्हे होत.
1. पूर्णविराम - (.) वापर वाक्य पूर्ण झाले की करतात. मी शाळेत जातो .
2. स्वल्पविराम - (,)
- वाक्यातील शब्द, विभाग किंवा वाक्याचा अंश यांचा वेगळेपणा दाखविण्यासाठी.
- मोठे वाक्यांश वेगळे दर्शविण्यासाठी
- समान वाक्ये निराळी दाखविण्याकरता.
- एकाच वाक्यात दोन पेक्षा अधिक शब्द आले असता.
- वाक्यात आरंभी संबोधन आल्यास संबोधनवाचक शब्दापुढे स्वल्पविराम या चिन्हाचा वाकेला जातो.
3. अर्धविराम(;)
- ज्यांचा परस्पर संबंध नाही असे वाक्यांश जेव्हा मोठ्या वाक्यात येतात तेव्हा त्या निरनिराळ्या वाक्यांशामध्ये अर्धविराम वापरतात.
- संयुक्त वाक्यातील समान वाक्ये वेगवेगळी दाखविण्यासाठी.
- दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता.
4 अपूर्णविराम -(:)
-वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास.
5. प्रश्न चिन्ह (?)
- याचा वापर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी करण्यात येतो.
- वाक्यात प्रश्न आला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते
- उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी वापर होतो.
६. अवतरण चिन्ह (“ ’’) (‘ ’)
8. संयोग चिन्ह - (-)
9. अपसरण चिन्ह (-)
- पूर्वी सांगितलेला मजकूर अधिक स्पष्ट करण्यासाठी त्या ओळीत मजकुराच्या मागे पुढे हे चिन्ह वापरतात.
- विशेष स्पष्टीकरणार्थ यादी देताना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏