एकवचन :- ज्या नामावरून एकाच व्यक्ती अथवा वस्तूचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे एकवचन असते.
उदाहरणार्थ:फुल , झाड , वही,
अनेकवचन :- ज्या नामावरून अनेक व्यक्ती अथवा वस्तूंचा बोध होतो ,तेव्हा ते त्या नामाचे अनेकवचन असते. उदाहरणार्थ:फुले , झाडे , घोडे, डोळे,
१) एक घर - अनेक घरे
२) एक सफरचंद - अनेक सफरचंदे
३) एक फूल - अनेक फुले
४) एक चिमणी - अनेक चिमण्या
एकवचन अनेकवचन
अंगरखा अंगरखे
अंगठा अंगठे
आंबा आंबे
ओढा ओढे
ओटा ओटे
उकिरडा उकिरडे
कायदा कायदे
काटा काटे
कांदा कांदे
किनारा किनारे
कोपरा कोपरे
कोळसा कोळसे
कोल्हा कोल्हे
कुत्रा कुत्रे
खड्डा. खड्डे
खांदा खांदे
गोळा गोळे
गोठा गोठे
गुन्हा गुन्हे
गुडघा गुडघे
घोडा घोडे
चेहरा चेहरे
चिमटा चिमटे
झरा झरे
झोका झोके
टांगा. टांगे
टिळा. टिळे
ठिपका ठिपके
डबा. डबे
डोळा डोळे
जिल्हा जिल्हे
ढिगारा ढिगारे
तवा तवे
ताट. ताटे
तालुका तालुके
ताशा ताशे
तुकडा तुकडे
थवा. थवे
दरवाजा दरवाजे
दवाखाना दवाखाने
दागिना दागिने
दाणा दाणे
देखावा देखावे
दिवा. दिवे
धडा. धडे
धरण धरणे
धबधबा धबधबे
धागा. धागे
धंदा. धंदे
नमुना नमुने
नकाशा नकाशे
नाला नाले
निखारा निखारे
अडचण अडचणी
आठवण आठवणी
ओळ ओळी
इमारत इमारती
केळ केळी
किंमत किंमती
गाय गायी
गोष्ट गोष्टी
गंमत गंमती
चाहूल चाहुली
चोच चोची
जमीन जमिनी
जास्वंद जास्वंदी
दुपार. दुपारी
दुर्बीण दुर्बीणी
तलवार तलवारी
तक्रार तक्रारी
पखाल पखाली
पेन्सिल पेन्सिली
बोर बोरी
बोट बोटी
भिंत भिंती
मुलाखत मुलाखती
म्हैस. म्हशी
रात्र. रात्री
लकेर लकेरी
वेल. वेली
विहीर विहिरी
सहल सहली
सकाळ सकाळी
सायकल सायकली
हिरवळ हिरवळी
वाटी. वाट्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏