चिलट व सिंह
जंगलात एकदा एक चिलट झाडखाली निवांत बसलेल्या एका सिंहाला गंमत म्हणून त्रास देत होते. त्याच्या कानाला, नाकाला, डोळ्याला चावत होते. त्यामुळे सिंहाला त्रास होत होता. म्हणून सिंह ते चिलट पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण चिलट काही पकडले जात नव्हते.
आपण सिंहाला कसा त्रास दिला, असे मनात म्हणत चिलट उडत असताना जवळ असलेल्या एका कोळ्याच्या जाळ्यात चुकून सापडले. चिलट विनाकारणच सिंहाला त्रास दयायला गेले आणि स्वतःच संकटात सापडले.
तात्पर्य :मुद्दाम कोणालाही त्रास देऊ नये . तसे करताना आपल्याला त्रास होऊ शकतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏