मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शब्दसमूहा बद्दल एक शब्द




 श्रम न करता खाणारा = ऐतखाऊ

लहान मुलाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत = अंगाईगीत

थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा = आशीर्वाद 

ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू

विविध बाबींत प्रवीण असलेला = अष्टपैलू

ज्याने लग्न केले नाही असा = अविवाहित (ब्रह्मचारी)

ज्याचा थांग (खोली) लागत नाही असे = अथाग

पडदा दूर करणे = अनावरण

थोडक्यात समाधान मानणारा = अल्पसंतुष्ट

कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू

एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती

मोजता येणार नाही इतके = असंख्य, अगणित

अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक

ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड

मनाला आल्हाद देणारा = आल्हाददायक

ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा = आजानुबाहू

लग्नात द्यावयाची भेट = आहेर

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत = आसेतुहिमाचल

नसलेली गोष्ट आहे असे वाटणे = आभास

संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत = आपादमस्तक

देव आहे असे मानणारा = आस्तिक

स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र = आत्मवृत्त, आत्मचरित्र

बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण = आबालवृद्ध

अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी = आदिवासी

वाटेल तसा पैसा खर्च करणे = उधळपट्टी

सतत पैसा खर्च करणारा = उधळ्या

ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा = उपकृत

उदयाला येत असलेला = उदयोन्मुख

शिल्लक राहिलेले = उर्वरित

जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राह शकणारा = उभयचर

अंग राखून काम करणारा = अंगचोर

दुसऱ्याच्या ताब्यात असलेला = अंकित

निरनिराळ्या राष्ट्रांतील = आंतरराष्ट्रीय

आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असा = कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष

कर्तव्याकडे पाठ फिरविणारा = कर्तव्यपराङ्मुख

जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी = कमलाक्षी

अंगी एखादी कला असणारा कलावान = कलाकार, कलावंत 

घरदार नसलेला = उपऱ्या, बेघर

सूर्याचे उत्तरेकडे जाणे = उत्तरायण

शापापासून सुटका = उ:शाप 

अतिशय उंच = मोजता येणार नाही इतके

अनुभव नसलेला = अननुभवी

अन्न देणारा = अन्नदाता

आवरता येणार नाही असे = अनावर

विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य = अतिक्रमण

आकाशातील ताऱ्यांचा पट्टा = आकाशगगा 

सतत उद्योगात मग्न असणारा = उद्यमशील

हळूहळू घडून येणारा बदल = उत्क्रांती

सतत एकटे राहण्याची आवड असलेला = एकलकोंडा

जिवंत असेपर्यंत = आजन्म

मरण येईपर्यंत = आमरण 

ढगांनी झाकलेले = अभ्राच्छादित

कधीही विसरता न येणारे = अविस्मरणीय

वर्णन करता येणार नाही असा = अवर्णनीय

कधीही नाश पावणार नाही असा = अविनाशी

ज्याला कोणी जिंकू शकत नाही असा = अजिंक्य, अजेय

सूचना न देता येणारा पाहुणा = आगतुक

तुलना करता येणार नाही असे = अतुलनीय

निराश्रित मुलांचा सांभाळ करणारी संस्था = अनाथाश्रम 

एकाच वेळी अनेक अवधाने राखून काम करणारा = अष्टावधानी

पायांत पादत्राणे न घालता = अनवाणी

पूर्वी कधीही न ऐकलेले = अश्रुतपूर्व

पूर्वी कधीही न पाहिलेले = अदृष्टपूर्व

कोणाच्याही पक्षात सामील न होणारा = अपक्ष

जे साध्य होत नाही ते = असाध्य

देवलोकातील स्त्रिया = अप्सरा

नेत्याचे अनुकरण करणारे व त्याच्या मागून जाणारे = अनुययी  

स्तुती गाणारा    =  भाट  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट