मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

केळी खाणे आरोग्यदायी

 *केळी खाणे आरोग्यदायी-* 


1)दिवसाची सुरूवात केळ्याने करा. चहा, काॅफी, तंबाखू, बिडीने नाही.


2) दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन व ब्लोटिंगपासून आपल्याला केळं वाचवतं.


3)केळं हे मुळात 'प्रिबायोटिक' असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला . दिवाळीच्या दिवसात फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास, उदा. अपचन, ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते. तेव्हा फराळ कराच पण केळं विसरू नका.


4) मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळं हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो. जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला 'फ्रुक्टोज' म्हणतात. ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते.

American Diabetes Association ने सुध्दा केळ्याला मान्यता दिली आहे.


5) केळ हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.


6)'बंदोबस्त' सारख्या महत्त्वाच्या आणि अतिशय थकवणाऱ्या  कामाच्या दिवसांमध्ये केळं आपल्याला डिहायड्रेशन व पायांत गोळे येण्यापासून वाचवते, जो त्रास आपल्याला जास्त काळ उभे राहिल्याने होतो.


7) केळ्यात असलेला खनिजांचा साठा ( minerals)  ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळं खाल्लच पाहिजे.


8) केळं हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जपणारे आहे. जे सफरचंदाला जमणार नाही.


9) दिवसाची सुरुवात केळ्याने केल्याने दिवस भरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.


*काही भेडसावणारे प्रश्न-* 


1) केळ्यांवर केमिकल्सचा मारा असतो, मग कसे खाणार? 

       आपल्या आसपास जी केळी होतात. त्या केळ्यांचे सेवन केल्यास ह्या समस्येवर मात करणे शक्य आहे. उदा. वेलची केळी, राजेळी केळी, हिरव्या सालीची केळी. तेव्हा आपल्या नेहमीच्या फळवाल्याला हिरव्या सालीची केळी आणायला प्रोत्साहित करा.


2) केळ खाल्ल्याने वजन वाढतं ?

         आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे  ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते. तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते. आणि चरबीत रूपांतर होऊ देत नाही. आपल्या आसपास ऋतुमानानुसार मिळणारी फळे- केळं, आंबा, चिकू, पेरू, द्राक्षं, सीताफळ, फणस इ.


3) आपण दिवसभरात किती केळी खाऊ शकतो?

         ह्या प्रश्नाचे खरे उत्तर फक्त आपले पोटच आपल्याला देऊ शकते. दिवसाची सुरुवात तर केळ्याने कराच. पण केळं दिवसभरात कधीही खाता येतात. भूक लागलेली असतांना वेळेच्या अभावी फक्त चहा + बिस्किट खाणं किंवा नुसता चहा पिणं किंवा रिकाम्या पोटी काम करणं या ऐवजी केळं खाल्लं तर डोकेदुखी, ॲसिडिटी, अपचन ह्या समस्यांवर नक्की मात करता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट