एखाद्या संख्येला अनेक संख्यांनी निःशेष भाग जात असेल तर त्या संख्या दिलेल्या संख्यांच्या विभाजक असतात. त्यावरून एखादी संख्या काही संख्यांच्या विभाजक आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी काही विभाज्यतेच्या कसोट्या निश्चित केलेल्या आहेत.
विभाज्यतेच्या कसोट्या
2 ची कसोटी : ज्या संख्येच्या एककस्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला 2 ने निःशेष भाग जातो.
3 ची कसोटी: ज्या संख्येला सर्व अंकांच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निःशेष भाग जातो.
4 ची कसोटी : ज्या संख्येतील एकक आणि दशकस्थानच्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला निःशेष भाग जात असेल तर किंवा शेवटी दोन शून्या असतील तर त्या संख्येला 4 ने निःशेष भाग जातो.
5 ची कसोटी : ज्या संख्येच्या एककस्थानी ० किंवा 5 यापैकी एखादा अंक असेल, तर त्या संख्येला 5 ने निःशेष भाग जातो.
6 ची कसोटी : ज्या समसंख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने निःशेष भाग जातो, त्या समसंख्येला 6 ने नि:शेष भाग जातो.
8 ची कसोटी : ज्या संख्येच्या एकक, दशक व शतकस्थानी असणाऱ्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येला 8 ने भाग जातो किंवा शेवटी तीन शून्या असतील तर त्या संख्येला 8 ने नि:शेष भाग जातो.
9 ची कसोटी : ज्या संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला जर 9 ने निःशेष भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने निःशेष भाग जातो.
10 ची कसोटी : ज्या संख्येच्या एककस्थानी शून्य हा अंक असेल तर त्या संख्येला 10 ने नि:शेष भाग जातो.
11 ची कसोटी: ज्या संख्येच्या समस्थानी असलेल्या अंकांची बेरीज व विषमस्थानी असलेल्या अंकांची बेरीज यातील फरक 0 किंवा 11 च्या पटीत असेल तर त्या संख्येस 11 ने नि:शेष भाग जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏