राष्ट्रीय प्रतीके
१ . राष्ट्रध्वज :- भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी आहे. सर्वांत वरच्या बाजूला केशरी रंग आहे.
मध्यभागी पांढरा व सर्वांत खाली हिरवा रंग आहे. पांढऱ्या रंगाच्या पट्टयावर मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे. हे चक्र सारनाथ येथील सिंहस्तंभावरील धर्मचक्रासारखे आहे. चक्रामध्ये २४ आरे आहेत. ध्वजाच्या उंची (रूंदी) चे व लांबीचे प्रमाण २ः३ असे असते. २४ जानेवारी, १९५० रोजी मान्य केले. २७ डिसेंबर, १९११ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत प्रथम गायिले गेले. हे गीत एकूण पाच चरणांचे असले तरी फक्त पहिल्या चरणाचाच राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला.
२. राष्ट्रगीत :- रवींद्रनाथ टागोर रचित 'जन गण मन' हे राष्ट्रगीत म्हणून घटना समितीने राष्ट्रगीत
जन गण मन अधिनायक, जय हे भारत भाग्य विधाता पंजाब - सिंधु - गुजरात मराठा द्राविड - उत्कल - बंगा विंध्य - हिमाचल - यमुना - गंगा उत्कल - जलधि तरंगा तव शुभ नामे जागे,तव शुभ आशिष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे जय जय जय, जय हे ।
(राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणावयास ५२ सेकंद लागतात.)
३ . राष्ट्रीय चिन्ह :- सारनाथ येथे सम्राट अशोकाने बांधलेला सिंह स्तंभ आहे. भारत
सरकारने राष्ट्रीय चिन्हात या सिंह स्तंभाला स्थान दिले आहे. या राष्ट्रचिन्हात एकूण तीन सिंह दिसतात. या स्तंभाच्या मध्यभागी चक्र असून, त्याच्या उजव्या बाजूला बैलाचे चित्र आहे; डाव्या बाजूला घोड्याचे चित्र आहे. या राष्ट्रचिन्हाच्या खालील बाजूस मुंडकोपनिषदातील 'सत्यमेव जयते' हे वचन देवनागरी लिपीमध्ये कोरले आहे. हे राष्ट्रीय चिन्ह २६ जानेवारी, १९५० रोजी मान्य करण्यात आले.
४. राष्ट्रीय गीत :- बंकिमचंद्र चटर्जीचे 'वंदे मातरम्' या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिलेला आहे. हे गीत म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील फार मोठी प्रेरणा होती. बंकिमचंद्रांच्या 'आनंदमठ' कादंबरीत हे गीत आहे.
५. राष्ट्रीय पंचांग :- २२ मार्च, १९५७ पासून राष्ट्रीय पंचांगाला मान्यता दिली गेली. याचा पहिला महिना चैत्र असून शेवटचा महिना फाल्गून आहे.
६. राष्ट्रीय पक्षी मोर
७. राष्ट्रीय प्राणी वाघ
८.राष्ट्रीय फूल कमळ
९. राष्ट्रीय खेळ= हॉकी
१०. राष्ट्रभाषा =हिंदी .
११.राष्ट्रीय बोधवाक्य - सत्यमेव जयते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏