राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या नव्या धोरणानुसार आता पहिलीपासूनच मराठी, इंग्रजीबरोबरच हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आली आहे.
नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले असून इयत्ता १ ते ५ मध्ये मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील.
अशी होणार अंमलबजावणी
२०२५-२६ इयत्ता १
२०२६-२७ इयत्ता २, ३, ४ आणि ६
२०२७-२८ इयत्ता ५, ७, ९ आणि ११
२०२८-२९ इयत्ता ८, १० आणि १२
नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत.
पारंपरिक १०-२-३ ऐवजी ५-३-३-४ रचना
पायाभूत स्तर : वय ३ ते ८ वर्ष - बालवाटिका - १, २, ३, तसेच इयत्ता पहिली व दुसरी
पूर्वतयारी स्तर : वय ८ ते ११ वर्ष - इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी
पूर्व माध्यमिक स्तर : वय ११ ते १४ - इयत्ता सहावी, सातवी व आठवी
माध्यमिक स्तर : वय १४ ते १८ - इयत्ता नववी ते बारावी
नव्या धोरणानुसार १०+२+३ ऐवजी आता ५+३+३+४ असा शैक्षणिक आकृतिबंध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏