३१ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १९८४: भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या.
* १९६६: दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
* १९४१: माऊंट रशमोअर या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
* १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
* १८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
* १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६वे राज्य बनले.
जन्म:
* १८७५: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्न (मरणोत्तर – १९९१).
* १८९५: सी. के. नायडू, भारतीय क्रिकेट खेळाडू.
* १८९७: चियांग काई-शेक, चीन गणराज्य (तैवान)चे पहिले पंतप्रधान.
मृत्यू:
* १९७५: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक.
* १९८४: इंदिरा गांधी, भारतीय पंतप्रधान.
* १८८३: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏