२२ ऑक्टोबर दिनविशेष:
महत्त्वाच्या घटना:
* १७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
* १९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
* १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
* १९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
* १९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.
* २००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१चे प्रक्षेपण केले.
* २००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
जन्म:
* १८४४: फ्रेंच अभिनेत्री सराह बर्नहार्ट.
* १८८१: क्लिंटन जोसेफ डेव्हिसन, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
* १९००: अश्फाकउल्ला खान, भारतीय क्रांतिकारक.
* १९०३: जॉर्ज वेल्स बीडल, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन जनुकशास्त्रज्ञ.
* १९०७: ज्योत्स्ना भोळे, मराठी अभिनेत्री आणि गायिका.
* १९१७: जोन फॉन्टेन, इंग्लिश-अमेरिकन अभिनेत्री.
* १९२०: टिमोथी लिअरी, अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि लेखक.
* १९२१: देवन आनंद, हिंदी चित्रपट अभिनेते.
* १९२९: लेव्ह यशिन, रशियन फुटबॉल गोलरक्षक.
* १९४३: कॅथरीन डेनेव्ह, फ्रेंच अभिनेत्री.
* १९४९: अर्सेन वेंगर, फ्रेंच फुटबॉल खेळाडू आणि प्रशिक्षक.
मृत्यू:
* १९१७: चार्ल्स पार्डे ल्यूकिस, इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक.
* १९३३: विठ्ठलभाई पटेल, भारतीय स्वातंत्र्यसेनानी.
* १९७८: ना. सी. फडके, मराठी साहित्यिक.
* १९९१: ग. म. सोहोनी, देहदान चळवळीचे पुरस्कर्ते.
* १९९८: अजित खान, हिंदी चित्रपट अभिनेते.
* २०००: प्रा. वसंत कानेटकर, मराठी नाटककार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏