९ ऑगस्ट रोजी घडलेल्या महत्त्वाच्या घटना:
* १९४२ - चले जाव आंदोलन - मुंबईत महात्मा गांधींना अटक.
* १९४५ - जपानच्या नागासाकी शहरावर अमेरिकेने परमाणु बॉम्ब टाकला. ७०-९०,००० व्यक्ती काही क्षणांत ठार, असंख्य जखमी. इतर हजारो व्यक्ती पुढील काही वर्षात आजाराने मृत्युमुखी.
* १९८७ - ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात १९ वर्षीय ज्युलियन नाइटने अंदाधुंद गोळ्या चालवुन ९ व्यक्तींना ठार मारले. इतर १९ जखमी.
* १९८९ - कैफु तोशिकी जपानच्या पंतप्रधानपदी.
* १९९३ - आल्बर्ट दुसरा बेल्जियमच्या राजेपदी.
* १९६५: सिंगापूर स्वातंत्र्य दिन. मलेशियातून बाहेर काढल्यामुळे सिंगापूर हा देश स्वतंत्र झाला.
९ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे जन्म:
* १९७५: भारतीय अभिनेते आणि निर्माते महेश बाबू यांचा जन्म.
* १९०९: कन्नड साहित्यिक, शिक्षणतज्ञ व इंग्रजी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. विनायक कृष्ण गोकाक यांचा जान्म.
* १९९१: अभिनेत्री आणि मॉडेल हंसिका मोटवानीचा जन्म.
* १८९०: गायक आणि नट केशवराव भोसले यांचा जन्म.
९ ऑगस्ट रोजी झालेले महत्त्वाचे मृत्यू:
* १९०१: मराठी रंगभुमीचे जनक विष्णूदास अमृत भावे यांचं निधन.
* १९९६: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचं निधन.
* २००२: सामाजिक कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांचं निधन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏