बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (RTE ACT 2009)
कलम क्र. १
संक्षिप्त नाव, विस्तार व प्रारंभ
कलम क्र. २
व्याख्या- प्राथ. शिक्षण (Elementary Education) म्हणजे इ. १ ते ८ वी पर्यंतचे शिक्षण
कलम क्र. ३
बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा अधिकार (वयोगट ६ ते १४)
कलम क्र. ४
बालकास त्याच्या वयाशी समकक्ष वर्गात निःशुल्क प्रवेश
कलम क्र. ५
दुसऱ्या शाळेत दाखला हस्तांतरित करण्याचा हक्क
कलम क्र. ६
समुचित शासन आणि स्थानिक प्राधिकरणाच्या शाळा स्थापन करणे.
कलम क्र. ७
आर्थिक इतर जबाबदाऱ्या (केंद्र व राज्यशासनाने आर्थिक तरतूद करून देणे.)
कलम क्र. ८
समुचित शासनाची कर्तव्ये (वंचित दुर्बल घटकातील बालकास कोणत्याही कारणावरुन प्राथमिक शिक्षण घेण्यापासून भेदभाव केला जाणार नाही.)
कलम क्र. ९
स्थानिक प्राधिकरण कर्तव्य (१४ वर्ष वयोगटापर्यंतच्या सर्व बालकांचे अभिलेखे विहित पद्धतीनुसार ठेवण्यात यावेत.)
कलम क्र. १०
माता पिता व पालक यांचे कर्तव्य त्यांनी बालकास किंवा पाल्यास नजीकच्या शाळेत प्राथमिक शिक्षणासाठी दाखल करणे.
कलम क्र. ११
शाळापूर्व शिक्षणाची तयारी.
कलम क्र. १२
मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठी शाळांची जबाबदारी
कलम क्र. १३
प्रवेशासाठी फी अथवा चाळणी पद्धत नसणे.
कलम क्र. १४
प्रवेशासाठी वयाचा पुरावा (वयाच्या पुराव्याअभावी कोणत्याही बालकास शाळेमध्ये प्रवेश नाकारता येणार नाही.)
कलम क्र. १५
प्रवेशास नकार देणे.
कलम क्र. १६
बालकास मागे ठेवण्यास व निष्कासनाय प्रतिबंध (प्रवेश दिलेल्या बालकास कोणत्याही वर्गात मागे ठेवता येणार नाही किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याला शाळेतून काढता येणार नाही.)
कलम क्र. १७बालकास शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध.
कलम क्र. १८
मान्यता प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतीही स्थापन न करणे.
कलम क्र. १९
शाळेसाठी असलेली मानके व निकष
कलम क्र. २०
अनुसूचीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार
कलम क्र. २१
शाळा व्यवस्थापन समिती
कलम क्र. २२
शाळा विकास आराखडा (शाळा व्यवस्थापन समिती शाळा विकास आराखडा तयार करील.)
कलम क्र. २३
शिक्षक नियुक्ती, अर्हता आणि सेवा, अटी व शर्ती दूर करणे.
कलम क्र. २४ शिक्षकांची कर्तव्ये आणि गा-हाणे दूर करणे.
१ शिक्षक नियमित व वक्तशीरपणे शाळेत हजर राहील.
२ - कलम २९ पोट कलम २ च्या तरतुदीनुसार अभ्यासक्रम संचलित करणे व विहित कालावधीत
पूर्ण करणे. अध्ययन क्षमतांचे मूल्यमापन करणे, आवश्यकतेनुसार अतिरिक्त पूरक शिक्षण देणे. ३
४ पालकसभा, पालकांच्या भेटी घेवून बालकाची नियमित हजेरी, संपादणूक पातळी, अध्ययनातील प्रगती व इतर संबंधित माहिती पालकांना वेळोवेळी देणे.
५ शिक्षक आपली कर्तव्ये पार पाडण्यात कसूर करतील त्यांच्यावर सेवा नियमांन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यास पात्र समजण्यात येतील.
६ शिक्षकांची कोणतीही गाऱ्हाणी असल्यास ती विहित करण्यात येतील.
कलम क्र. २५
विद्यार्थी-शिक्षक प्रमाण (विदयार्थी-शिक्षक प्रमाण राखण्याच्या दृष्टीने कोणत्याही कारणास्तव शाळेमधील शिक्षकास अन्य शाळेत, कार्यालयात व अशैक्षणिक कामी वापरता येणार नाही.) (कलम २७ मधील नमूद कामाशिवाय)
कलम क्र. २६
शिक्षकांची रिक्त पदे भरणे.
कलम क्र. २७
शिक्षकांचा अशैक्षणिक कामासाठी वापर करण्यास प्रतिबंध (कोणत्याही शिक्षकास दशवार्षिक जनगणना, आपत्ती निवारणासाठी कामे किंवा निवडणुकांच्या कर्तव्याखेरीज अन्य कोणत्याही अशैक्षणिक प्रयोजनासाठी नेमण्यात येणार नाही.)
कलम क्र. २८
शिक्षकास खासगी शिकवणीस प्रतिबंध. (कोणत्याही शिक्षकास खासगी शिकवणी अथवा खासगी अध्यापन कृतीमध्ये स्वतःला भाग घेता येणार नाही.)
कलम क्र. २९ प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करणे.
कलम क्र. ३० परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र. (कोणत्याही बालकास कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही.)
कलम क्र. ३१ बालकांच्या हक्काचे संरक्षण.
कलम क्र. ३२ गान्हाणी दूर करणे. (एखादया व्यक्तीला कोणत्याही बालकाच्या अधिकाराशी संबंधित कोणतेही गाऱ्हाणे मांडायचे झाल्यास तिला स्थानिक प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करता येईल.
कलम क्र. ३३ व ३४- राष्ट्रीय / राज्य सल्लागार परिषदेचे गठण.
कलम क्र. ३५ निर्देश देण्याचा अधिकार.
कलम क्र. ३५ खटला दाखल करण्यासाठी पूर्व परवानगी. (उचित शासनाच्या अधिसूचनेने प्राधिकृत अशा अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय १३ (२), १८ (५) व १९ (५) या खाली शिक्षा पात्र असलेला कोणताही खटला दाखल करता येणार नाही.
कलम क्र. ३७सदर हेतूने केलेल्या कृतीस संरक्षण.
कलम क्र. ३८ समूचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏