संत सेवालाल महाराज
*बंजारा समाजाचे अराध्य दैवत...*
मानवतावादी कल्याणाची गुढी उंचच नेणा-या अशाच एका महान संताची आज जयंती आहे. त्या संताचे नाव आहे संत सेवालाल महाराज.
*अशा या महान संतास जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!!*
●जन्म :~ १५ फेब्रुवारी १७३९,
●मृत्यू :~ २ जानेवारी १७७३
निसर्गपूजक, कृषी संस्कृती रक्षक, पशूपालक, काटक अशा आदिम बंजारा समाजाचे अराध्य दैवत म्हणजे संत सेवालाल महाराज होय. त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 साली आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील गोलालडोडी तांडा येथे झाला. वडील भीमानायक राठोड रामावत व माता धर्मणी या राजवंशीय जोडप्याचे ते जेष्ठ अपत्य.घरात कृषी सुबत्ता खूप होती.सेवाभाया व त्यांचे तीनही बंधू हापानायक ,बदूनायक,पुरानायक हे अतिशय शूर होते.
बंजारा समाज हा तांडा करुन राहतो.बदलत्या काळासोबत बंजारा समाजातही परिवर्तन झालं आहे.पण तरीही लोकजीवन ,संस्कृती ,बोलीभाषा ,पेहराव ,पारंपारिक नृत्य ,लोकगीते या बाबतीत हा समाज स्वतंञ ओळख कायम ठेऊन आहे.आज तांड्यावरील लोकजीवन स्थिर भासत असले तरी पोटासाठी हंगामी स्थलांतर चुकलेले नाही.पशूपालन व व्यापार हा बंजारा समाजाचा पारंपारिक व्यवसाय होता.त्यासाठी सतत भ्रमंती करावी लागत असे.मोगली आक्रमण व पुढे इंग्रजांच्या काळात पारंपारिक व्यवसाय बुडीत निघाले.त्यामुळे सामाजिक जनजीवनही विस्कळीत झाले.बंजारा समाजाला या बदलत्या परिस्थितीचा खूप मोठा फटका बसला.गुजरात ,कर्नाटक ,महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश ,मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश ,पंजाब अशा प्रांतात हा समाज मोठ्या संख्येने विखुरला गेला.बडद बंजारा व लमाण बंजारा अशा दोन मुख्य उपशाखा असलेला समाज देशभरात काही उपजातींनीही ओळखला जातो.बडद म्हणजे बैल .बैल या पशूधनाशी संबंधित शाखा म्हणजे बडद बंजारा.मीठाचा व्यापार करणारी शाखा म्हणजे लमाण बंजारा.लवण या मीठाच्या समानार्थी शब्दावरुन लम्बाना ,लम्बानी व पुढे फक्त लमानी असा शब्द रुढ झाला.
संत सेवालाल महाराजांच्या जन्मावेळी हा समाज भारतभर विखुरलेला होता.शिक्षणाचा अभाव तर होताच शिवाय पोटापाण्यासाठी व्यवसायाचीही समस्या उभी राहिलेली होती.सेवालाल महाराजांनी जनजागृती केली.स्वतः तांड्या तांड्यावर फिरले.समाज व्यसनाधिनता ,गुन्हेगारी यांनी वेढला गेला होता.महाराजांनी बंजारा समाजाला ऐतिहासिक संस्कृतीची जाणीव करुन दिली.लडी भजन ,सत्संग ,भजन यामधून लोकांना साध्या सरळ सोप्या भाषेत शिकवण दिली.थाळी नादावर आधारित भजन हा प्रकार आजही रुढ आहे.सेवालाल महाराजांची शिकवण आजही बंजारा समूहाला तोंडपाठ आहे.
सेवालाल महाराजांनी सांगितलेली तत्वे ही सकल मानव जातीच्या कल्याणासाठी आजही उपयोगी आहेत.
◆सत्य... सत्य जाणणे यातच जीवनाचे सार आहे.सत्य हेच जीवन आहे.महाराज सोप्या भाषेत सत्याचे महत्व सांगत.
◆कोणालाही दंडित न करणे-- गोरगरीबांना वेगवेगळ्या कारणाने दंड आकारुन, त्यांचे शोषण करुन स्वतःचे पोट भरणा-या लोकांना सेवालाल महाराज कडक शब्दात फटकारत असत. ते म्हणायचे
*गोर गरीबेन डांडन खाये - सात पिढी नरकेमा जाये...*
*ओरे वंशेपर कोनी रिये पायरीरो भाटा बनीयेर...*
क्रांतीकारी संत--- संत सेवालाल महाराज क्रांताकारी संत होते. क्रांताकारी म्हटलं की लोकांना वाटतं ढाल तलवारी बंदुकीच असतील. महाराज शस्ञांच्या पठडीतील क्रांताकारी नव्हते, समाज सुधारणेतील क्रांतीकारक होते. त्या काळातील लोकजीवन व सेवालाल महाराजांचे कार्य यांचा तुलनात्मक अभ्यास केला की सेवालाल महाराजांची क्रांतीकारी विचारसरणी लक्षात येते. अक्षरशञू झालेल्या बंजारा समाजाला त्यांनी शिक्षणाचे महत्व सांगितले. स्ञी शिक्षणाचा आग्रह धरला. पशुबळी प्रथा बंद केली. स्वतः श्रीमंत असूनही आपला पुतण्या जेतालालचा विवाह त्यांनी सामका नावाच्या अत्यंत गरीब घरातील मुलीसोबत लावून दिला.राजा बोले अन् दल हले असे एक मराठी म्हण प्रचलित आहे. बंजारा समाजातही नायक बोले तांडा चाले ही पद्धत होते. जात पंचायतीत नायक ,कारभारी यांच्याकडून अन्याय होत असे.नायक पद्धतीला त्यांनी विरोध केला. त्यागी, दूरदर्शिता, बुद्धीप्रामाण्यावर आधारित असे त्यांचे जीवनकार्य आहे.
*★ तीर्थक्षेञ पोहरादेवी...*
यवतमाळ जिल्ह्यातील पोहरादेवीला बंजारा समाजाचे तीर्थक्षेञ म्हटले जाते. वर्षातून चार वेळा तेथे याञा भरते. रामनवमीला लाखोंच्या संख्येने बंजारा समाज पोहरादेवीला येतो.
संत सेवालाल महाराज बंजारा समाजाचे अराध्य दैवत असले तरी त्यांची शिकवण सर्वच जाती धर्मासाठी "पोरीया तारा" म्हणजे दीपस्तंभी मार्गदर्शकच आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏