मनःपूर्वक अभिनंदन इंडिया..
वूमन्स टीम इंडियाने आयसीसी अंडर १९ टी २० वर्ल्ड कप २०२५ चा किताब आपले नावे करत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने ९ विकेट्सने धुव्वा उडवला. तर दक्षिण आफ्रिरेकेने टीम इंडियाला विजयासाठी ८३ धावांचे आव्हान दिले होते.
टीम इंडियाने आपली यशस्वी खेळ करत २०२५ चा सामना जिंकला. यामुळे सोशल मीडियावर टीम इंडियाचे अभिनंदन केले जात आहे. फायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर त्यांनी २० षटकांच्या सामन्यात केवळ ८२ धावा केल्या. तर टीम इंडियाने या धावा केवळ ११.२ ओव्हरमध्ये १ विकेट गमावत पूर्ण केल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏