खाशाबा जाधव
━═•●◆●★●◆●•═━
हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
◆नाव :~ खाशाबा दादासाहेब जाधव
◆राष्ट्रीयत्व :~ भारतीय.
◆निवासस्थान :~ कराड तालुका,
सातारा जिल्हा, महाराष्ट्र
●जन्म :~ १५ जानेवारी १९२६
●मृत्यु :~ १४ ऑगस्ट १९८४
★कुस्तीकामगिरी व किताब :~ ऑलिंपिक स्तरइ.स. १९५२ हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा': ५२ किलो. फ्रीस्टाइल कुस्ती; कांस्यपदके
जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यातील एका मराठा कुटूंबात झाला. त्यांची कुस्ती खेळात ख्याति होती. भारत देशातील ते ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे पहिले खेळाडू होते. सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्वर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिक मध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते. हा एकमेव ऑलिंपिक पदक विजेता होता की त्याला भारत सरकारने पद्म अवॉर्ड दिला नाही. तो स्वतःच्या हिमतीवर तयार झाला. याची दुरवस्था पाहून रीस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला १९४८ चे ऑलिंपिक पूर्वी मार्गदर्शन केले.
★ कुस्ती ★
त्याचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याचे वयाचे ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. महाविध्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही. भारताचे स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी भाग घेतला होता. त्याने ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचा निश्चय केला होता.
सन १९४८ मध्ये जेव्हा लंडन ऑलिंपिक साठी फ्लायवेट गटासाठी यांची निवड झाली तेव्हा ते ६ व्या क्रमांकावर राहिते. या क्रमांकापर्यंत पोहचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. त्यावेळी गादीवरील कुस्ती प्रकार आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती नियमावलीशी हा त्यांचा ६ वा क्रमांक पुढे घेवून जाणारा ठरला नाही. पुढील सन १९५२ सालच्या हेलसिंकी येथे होणार्या ऑलिंपिक साठी जरी ते पुढील बंटमवेट गटात (५७ की.) गेले तरी त्यांनी जोरदार तयारी केली. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनल पर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी त्याना ब्रांझ पदकावर समाधान मानावं लागलं पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.
गादीवरील कुस्तीत पाय घसरतात. खेळताना दोन चुका झाल्या त्याने गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले, असे त्यांचे बरोबर गेलेले त्यांचे चुलत भाऊ संपतराव जाधव म्हणाले.
सन १९५५ मध्ये ते सब इंस्पेक्टर या हुद्दयावर महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. तेथे अंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलिस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि अशीस्टंट पोलिस कमिशनर या हुद्दयावरून निवृत्त झाले. पेन्शन साठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे जीवन गरिबीत गेले. त्यांचा सन १९८४ मध्ये एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला.
◆देशाने केलेला आदर◆
सन २०१० मध्ये आदरयुक्त भावनेने दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मधील कुस्ती विभागाचे स्थळाला त्यांचे नाव दिले. सन २००१ मध्ये त्यांना अर्जुन आवार्ड दिला.
नॅशनल बुक ट्रस्टचे संजय सुधाने यांनी त्यांचेवर ऑलिंपिक वीर के.डी.जाधव हे पुस्तक लिहिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏