हार्दिक अभिनंदन खूप खूप शुभेच्छा....
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील काही बड्या चेहऱ्यांचाही समावेश आहे.
महाराष्ट्रातून कोणाकोणाला पद्म पुरस्कार जाहीर?
केंद्र सरकारने महाराष्ट्रासह देशाच्या इतरही भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात अनोखे काम करणाऱ्यांच्या नवांची पद्म पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्या नावांची आज घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कोणाकोणाला पद्म पुरक्कार जाहीर?
हिंदी लेखक जगदीश जोशीला यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
लोकगायक नरेन सुरंग यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पैरो सिंह चौहान यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
यासह कर्नाटकचे लोकगायक वेंकप्पा अंबाजी यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सम्नान केला जाणार आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा समावेश आहे. डांगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले आहे. नागपूर नाही तर संपूर्ण विदर्भात वैद्यकीय सेवेतले भीष्म पितामह अशी डॉ. डांगरे यांची ओळख आहे. गेल्या ५० वर्षात त्यांनी एक लाखाहून अधिक रुग्णांना बरे केले आहे. फक्त रुग्णांवर उपचार नाही तर त्यांनी अन्य डॉक्टरांना प्रशिक्षित केले आहे.
डॉ. डांगरे यांच्यासह साहित्यिक मारुती चितमपल्ली; वन, वानिकी तसेच वन्यजीव संवर्धन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चैत्राम पवार यांना यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏