14 जानेवारी भूगोल दिन
*१४ जानेवारी हा दिवस भूगोल दिन म्हणून राज्यातील शालेय पातळीवर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भूगोल महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा १४ जानेवारी हा जन्मदिन "राष्ट्रीय भूगोल दिन" म्हणून साजरा करतात. शाळांमध्ये हा दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जातो.*
भूगोल... शालेय जीवनातील बहुतेकांचा नावडता विषय, मात्र तेवढाच उत्साहवर्धक विषय. या भूगोलाच्या विषयी जनसामान्यात असणारी भीती दूर व्हावी, त्याचे महत्व लोकांना समजावे, या उद्देशाने भारत सरकारकडून साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे 'राष्ट्रीय भूगोल दिन'. मकर संक्रातीला अर्थात 14 जानेवारीला हा दिवस साजरा करण्यात येतो. सूर्याचे उत्तर गोलार्धातून दक्षिण गोलार्धात भ्रमण सुरु होते म्हणून भारतीय पंचागात संक्रातीला अतिशय महत्त्व आहे.
भूगोल मानवी आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोजच्या जीवनातील अनेक बाबी या भूगोलाशी संबंधित आहेत. मकर संक्रांत हा सण तर त्याचेच एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. भूगोलाच्या विविध शाखा आहेत. जसे राजकीय भूगोल, वस्ती भूगोल, हवामानशास्त्र, आर्थिक भूगोल, लष्करी भूगोल वगैर आहेत. मात्र शालेय अभ्यासक्रमात फक्त राजकीय भूगोलाचाच विचार करण्यात येतो. त्यामुळे अत्यंत रंजक असणारा भूगोल विषय कंटाळवाणा होतो आणि भूगोलाशी असणारा संपर्क तुटतो..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏