लेबल
- चालू घडामोडी current knowledge (37)
- जनरल नॉलेज (39)
- परीक्षा exam (15)
- प्रेरणादायी लेख (60)
- बोधकथा (14)
- महान व्यक्ती (special person) (61)
- महाराष्ट्रातील जिल्हे (29)
- विशेष प्रश्नमंजुषा (27)
- शासन निर्णय gr (45)
- शिक्षक दिन भाषण (4)
- शिक्षण विस्तार अधिकारी/केंद्रप्रमुख परीक्षा (112)
- सातारा प्रज्ञाशोध परीक्षा टेस्ट (61)
- सामान्य ज्ञान टेस्ट (2)
- स्कॉलरशिप नवोदय परीक्षा (50)
- स्कॉलरशिप परीक्षा (20)
- स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट आठवी (13)
- स्पर्धा परीक्षा टेस्ट (27)
blog html
बुधवार, ५ जून, २०२४
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ
मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत त्याचे वेगवेगळे अर्थ असतात अशा अर्थाचे शब्द खालील प्रमाणे आहे...नाद ….छंद, आवाज
नाव…... होडी, कशाचेही नाव
पक्ष….. वादातील बाजू, पंख, पंधरवडा, राजकीय
संघटना
पय…. पाणी, दूध
पर ….परका, पीस
पात्र …..भांडे, नदीचे पात्र, नाटकातील पात्र,
कारणीभूत, योग्य
पार ….पलीकडे, वडाच्या भोवतालचा पार
पूर ….नगर, पाण्याचा पूर
भाव….भक्ती, किंमत, दर, भावना
भेट …..नजराणा, भेटणे
मान…. मोठेपणा, शरीराचा एक भाग
माया…. ममता, धन, कपडा शिवताना कडेने
सोडलेली जागा
माळ...मुलांची माळ, ओसाड जागा
वर….आशीर्वाद, वरची दिशा, ज्याचे लग्न
ठरले आहे असा पुरुष
वल्ली ….वेल, स्वच्छंद माणूस
वाणी…. उद्गार, व्यापारी, एक सरपटणारा किडा
वात...वारा, विकार, दिव्याची वात
वारी….पाणी, यात्रा, नियमित मेरी
वाली…..रक्षणकर्ता, पुराणकथेतील एका वानराचे नाव
विभूती ….पुण्यपुरुष, भस्म, अंगारा, रक्षा
सुमन ...मूल, पवित्र मन
सूत….धागा, सारथी
हार…. पराभव, फुलांचा हार
अंक …. मांडी, आकडा (संख्या)
अंग …. शरीर, भाग, बाजू
अंतर…. मन, भेद, लांबी
अभंग ….अभंग न भंगलेला, काव्यरचनेचा एक प्रकार
अंबर …. आकाश, वस्त्र
अनंत….अमर्याद, परमेश्वर
आस ...इच्छा, गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा
ऋण…. कर्ज, उपकार, वजाबाकीचे चिन्ह
ओढा…. मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ
कर…. हात, किरण, सरकारी सारा
कर्ण …. कान, महाभारतातील योद्घा, त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू
कळ …. भांडणांचे कारण, गुप्त किल्ली, वेदना
काळ…. वेळ, यम, मृत्यू
घाट …. डोंगरातील रस्ता, नदीच्या पायऱ्या
चिरंजीव ….मुलगा, दीर्घायुषी
जलद …. ढग, लवकर
जीवन …. आयुष्य, पाणी
डाव…. कारस्थान, कपट, खेळी
तट…. किनारा, कडा, किल्ल्याची भिंत
तळी …. तळाला, तलाव , ताम्हन, खंडेश्वराच्या आराधनेचा प्रकार
तीर…. काठ, बाण
दंड …..शिक्षा, काठी, बाहू
द्विज …. पक्षी, ब्राह्मण
धड …. मानेखालचा शरीराचा भाग, अखंड, स्पष्टपणे
ध्यान …. चिंतन, समाधी, भोळसट व्यक्ती
वास…. सुगंध वस्ती
शृंग ….शिखर, सिंग
चमचा ….एक पात्र ,ढवळाढवळ करणाऱ्या माणसाची विशेषण
मित्र …. सूर्य,दोस्त
चपला ….वीज वाहन
लोकप्रिय पोस्ट
-
टेस्ट सोडवा सर्टिफिकेट मिळवा Loading…
-
परीक्षेला येणारे हमखास व अचूक प्रश्न Loading…
-
हमखास यश मिळणारच... परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त प्रश्न टेस्ट सोडवा अधिक माहितीसाठी www.vkbeducation.com ला भेट द्या.🙏🙏🙏 Loa...
-
राष्ट्रीय गणित दिनानिमित्त विशेष प्रश्नमंजुषा टेस्ट सोडवा आकर्षक प्रमाणपत्र मिळवा 🙏🙏🙏 Loading…