माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाचे 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गुरुवारी रात्री उपचारासाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
देशाच्या राजकारणात विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. डॉ. मनमोहन सिंग देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूआणि इंदिरा गांधी यांच्यानंतर 10 वर्ष पंतप्रधान राहणारे पहिले पंतप्रधान होते.
डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांनी1952 मध्ये पंजाब विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून त्यांचे इकॉनॉमिक ट्रायपोस पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डी.फिल केले होते. तर 1971 मध्ये भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. त्यांना लवकरच 1972 मध्ये वित्त मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदोन्नती देण्यात आली होती.
1987 मध्ये पद्मविभूषण, 1993 मध्ये युरो मनी अवॉर्ड ऑफ द इयर ऑफ द इयर, 1993 आणि 1994 या दोन्ही वर्षातील अर्थमंत्र्यांचा आशिया मनी पुरस्कार आणि 1995 मध्ये भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार यांचा समावेश आहे. याशिवाय डॉ. सिंग यांनी वित्त मंत्रालयात सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष अशी पदेही भूषवली होती.
मनमोहन सिंग यांचा शैक्षणिक आणि राजकीय प्रवास
1957 ते 1965- पंजाब विद्यापीठ, चंदीगडमध्ये शिक्षक झाले.
1969 ते 1971- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे प्राध्यापक.
1976- जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे मानद प्राध्यापक झाले.
1982 ते 1985- भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते.
1985 ते 1987 - नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष.
1990 ते 1991- पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते.
1991- नरसिंह राव सरकारमध्ये अर्थमंत्री बनले.
1991- आसाममधून पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले.
1996- दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक झाले.
1999- दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला.
2001- तिसऱ्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले आणि सभागृहात काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बनले.
2004 ते 2014- भारताचे पंतप्रधान होते.
2019-2024: सहाव्यांदा राज्यसभेचे सदस्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏