हार्दिक अभिनंदन सर्व शिक्षक वृंद🌹🌹🌹
शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप 2025 विजयकुमार भुजबळ यांना जाहीर
प्रत्येक वर्षी शरदचंद्र पवार इन्स्पायर फेलोशिप शिक्षण साठी महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी 20 आणि माध्यमिक शिक्षकांसाठी 10 साठी दिली जाते.
यावर्षी सातारा जिल्ह्यातून विजयकुमार किसन भुजबळ उपशिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर यांची निवड झाली आहे, भुजबळ यांच्या *आर्मी मुलींची लढाई संकटाशी* या उपक्रमासाठी निवड झाली आहे. . भुजबळ सर हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात शरदचंद्र पवार फेलोशिप साठी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्या अभिनंदन होत आहे , भुजबळ हे तंत्रस्नेही शिक्षक असून vkbeducation.com हा ब्लॉग शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. तसेच ते शिक्षकांच्या प्रश्नासाठी कार्यरत असून अखिल सातारा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस आहेत.
कोरेगाव तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे साहेब ,शिक्षण विस्ताराधिकारी वनिता मोरे मॅडम, मनीषा चंदुरे मॅडम, सीमा बर्गे मॅडम, संगीता नलवडे मॅडम, केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी मॅडम मुख्याध्यापक मंगल शिंदे मॅडम आणि रेखा पवार, वृषाली घोरपडे, वैशाली बागाव, सारिका टंकसाळे, अश्विनी कुंभार, रेश्मा बागडे या सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏