साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. साहित्य अकादमीने २० भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात मराठीत ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
साहित्य अकादमीने २१ भाषांमध्ये ८ काव्यंसग्रह, तीन कादंबरी, २ लघुकथा संग्रह, ३ साहित्य समीक्षक,१ नाटक आणि एक संशोधनासाठी पुरस्कार दिला. बंगाली, डोगरी आणि उर्दू भाषेसाठीचे पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीने सांगितलं आहे.
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्याला सन्मानचिन्ह, शाल आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाते. ८ मार्च २०२५ रोजी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
आसामी भाषेत समीर तांती, बोडो- अरोन राजा, इंग्लिश -इस्टरिन किर, गुजराती - दिलीप झवेरी, हिंदी - गगन गिल , कन्नड- केव्ही नारायणा, काश्मिरी-सोहन कौल, कोंकणी-मुकेश थाली, मैथिली - महेंद्र मलांगिया, मल्याळम - जयकुमार, मणिपूरी - हाओबम सत्यवती देवी, मराठी-सुधीर रसाळ, नेपाळी - युवा बराल, ओडिया - वैष्णव चरण समल, पंजाबी - पॉल कौर, राजस्थानी-मुकुट मनिराज, संस्कृत - दीपक कुमार शर्मा, सैंतली - महेश्वर सोरेन, सिंधी - हुंदराज बलवानी, तामिळ - एआर व्यंकटचलपथी, तेलुगु - पेनुगौंडा लक्ष्मीनारायण
डॉक्टर सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक पुस्तकासाठी यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुधीर रसाळ हे सध्या ९१ वर्षांचे असून या वयातही अलिकडेच त्यांच्या १६ व्या पुस्तकाचं प्रकाशन पार पडलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलंय. तसंच प्राध्यापक म्हणूनही त्यांची चांगली ओळख आहे. त्यांनी शासकीय कला महाविद्यालय आणि मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏