blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

महत्वाच्या लिंक IMP

मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

स्कॉलरशिप/स्पर्धा परीक्षा/जनरल नॉलेज

मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

MAHA TET) 2024 प्रवेश पत्र उपलब्ध

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून  (MSCE) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) 2024 परीक्षा संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर प्रसिद्ध (Admit card released) करण्यात आले आहेत. परीक्षेत सहभागी झालेल्या उमेदवारांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. परीक्षा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ mahatet.in वर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. 

राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) नोव्हेंबर 2024 येत्या 10 नोव्हेंबर रोजी राज्यातील 36 जिल्ह्यात आयोजित केली जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-एक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा ते एक वाजेपर्यंत घेतला जाणार आहे. तर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर- दोन दुपारी अडीच ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. 

टीईटी परीक्षा घोटाळा समोर आल्यानंतर TET परीक्षा अत्यंत पारदर्शकपणे व सुरळीतपणे घेण्याच्या दृष्टीने राज्य परीक्षा परिषदेने ऑनलाईन टीईटी परीक्षा घेण्यासंदर्भात विचार केला होता. परंतु,परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विविध भाषेमध्ये तयार करण्यात अडचणी येत असल्याने टीईटी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याचा निर्णय झाला. त्यादृष्टीने आता तयारी करण्यात आली आहे.राज्यातील 1029 परीक्षा केंद्रांवर 10 नोव्हेंबर रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन सुरू आहे. 

असे डाउनलोड करा  प्रवेशपत्र

सर्वप्रथम. mahatet.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा. विचारण्यात आलेल्या आवश्यक तपशील प्रविष्ट करा. पुढे महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करा येथे क्लिक करून ते डाऊनलोड करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट