जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) मुख्यमंत्रीपदी आज बुधवारी (दि. १६ ऑक्टोबर २०२४ )ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah Oath Ceremony) यांनी शपथ घेतली. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स (NC) पक्षाला यश मिळाले. केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर ओमर अब्दुल्ला हे जम्मू- काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. आज शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (SKICC) येथे मुख्यमंत्रीपदी ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏