मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेत डाव्या विचारसरणीचा नेता राष्ट्राध्यक्षपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अनुरा यांनी या निवडणुकीत नमल राजपक्षे, साजिद प्रेमदासा आणि रानिल विक्रमसिंघे या तीन प्रसिद्ध उमेदवारांचा पराभव केला आहे.
जनता विमुक्ती पेरामुना (JVP) पक्षाचे नेते दिसानायके या निवडणुकीत नॅशनल पीपल्स पॉवर (NPP) आघाडीकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनले होते. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अनुरा या पदापर्यंत पोहोचण्याची कहाणी खूपच रंजक आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏