रीया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा प्रतिष्ठित ताज जिंकला आहे. जयपूरमध्ये रविवारी झालेल्या भव्य सोहळ्यात रियाने बाजी मारली. या सोहळ्याला मोठी प्रतिष्ठा मिळाली होती, ज्यामध्ये देशभरातील सुंदरता आणि व्यक्तिमत्त्वाची उत्तम उदाहरणं असलेल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता.
रियाच्या या विजयामुळे ती आता भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार आहे.
विजयानंतरच्या आपल्या भावना व्यक्त करताना रियाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ANI शी बोलताना ती म्हणाली, "आज मी मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज जिंकला आहे. या क्षणी मी अत्यंत आनंदित आणि आभारी आहे. या ताजसाठी मी खूप मेहनत घेतली आहे, आणि आज मी स्वतःला या मुकुटासाठी योग्य समजते. पूर्वीच्या विजेत्यांमुळे मला प्रेरणा मिळाली."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏