मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०२४

महाराष्ट्र राज्य विज्ञान प्रदर्शन 2024-25







उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचे ५२ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक ०१ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ (अंदाजित कालावधी) या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. यावर्षी एन.सी.ई. आर.टी. नवी दिल्ली यांच्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय " शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान" (SCIENCE AND TECHNOLOGY FOR

SUSTAINABLE FUTURE) असा निश्चित केला आहे. सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.

१ अन्न, आरोग्य आणि स्वच्छता (A Food, Health and Hygiene.)

२ वाहतूक आणि दळणवळन (Transport And Communication.) ३ नैर्सगिक शेती (Natural Farming.)

४ आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management.)

५ गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार (Mathematical Modelling and

Computational Thinking.)

६ कचरा व्यवस्थापन (Waste Management)

७ संसाधन व्यवस्थापन (Resource Management)

उपरोक्त उपविषयापैकी कोणत्याही एका उपविषयावर आधारित उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यतच्या (इयत्ता ९ वी ते १२ वी) शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदर्शनीयवस्तु, प्रतिकृती, वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्याचे अपेक्षित आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि खेळण्यांमधील नवकल्पनांचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तु विकसित करण्याचे स्वातंत्र्य आहे.

महत्वाची सूचना: प्रतिकृतीची निवड करतांना दोन्ही गटात दिलेल्या प्रत्येक उपविषयामधून प्रतिकृतीची निवड करावी.

सहभाग: एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली यांच्या संदर्भीय दिशा निर्देशान्वये या विज्ञान प्रदर्शनात आपल्या जिल्हयातील

सर्व मान्यता प्राप्त शाळेतील पुढील दोन गटातील विद्यार्थी (D) उच्च प्राथमिकस्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंतचे विद्यार्थी)

(ii) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९वी ते१२ वीचे विद्यार्थी) सहभागी होऊ शकतात, या विद्यार्थ्यांनी

त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेतील प्रयोगशाळा परिचर/सहाय्यक यांच्या मदतीने वरील उपविषयापैकी एका उपविषयावर आधारित प्रदर्शनीय वस्तु / प्रतिकृती / वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे अभिप्रेत आहे. या व्यतिरिक्त विद्याथ्यांना मूळ संकल्पनेवर आधारित कोणताही उपविषय निवडण्याचे स्वातंत्र्य असेल.

(iii) जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांच्यामधून एका विद्याव्यांची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठविण्यात यावे. या दिव्यांग विद्याव्यांजवळ सक्षम अधिकाऱ्यांचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

NCERT पांचे उपरोक्त संदर्भीय दिशानिर्देशान्वये राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता मूल्यमापनासाठी (1) उच्च प्राथमिक स्तर (इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत) (ii) माध्यमिक व उच्च माध्यमिकस्तर (इयत्ता ९ वी ते १२ वी) असे दोन गट निश्चित केलेले आहेत.

विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वीच्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले वेज्ञानिक प्रकल्प/ प्रदर्शनीय वस्तूंचे पुन्हा यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण व पुनरावृत्ती होणार नाही, तसेच INSPIRE Award प्रदर्शनात सहभाग घेतलेले विज्ञान प्रकल्प/वैज्ञानिक प्रतिकृती तालुकास्तरीय /जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात पुन्हा मांडले जाणार नाहीत, त्याचप्रमाणे बाजारातून रेडीमेड साहित्य विकत घेऊन विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात येणार नाही, याची दक्षता घ्यावी.

व्याप्ती :- या विज्ञान प्रदर्शनात राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळा सहभागी होतील, मान्यता प्राप्त शाळा म्हणजे (१) शासकीय (२) माजी शासकीय जिल्हा परिषद (३) महानगर पालिका नगर पालिका नगर परिषदेच्या शाळा (४) खाजगी अनुदानित/विना अनुदानित/ कायम विना अनुदानित शासन मान्य शाळा (५) मिशनरी शाळा (६) आश्रम शाळा इत्यादी प्रकारच्या शाळा होय. प्रत्येक शाळेतून वरीलपैकी एका गटात एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच विद्याची सहभाग घेऊ शकेल.

प्रदर्शन कालावधी : (१) राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनाची पूर्व तयारी म्हणजे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन होय. आपल्या जिल्हयात पुढील कालावधीत प्रदर्शनाचे आयोजन करावे.
डाऊन लोड करा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट