PhD Admission : पीएचडी प्रवेश ; 10 ऑगस्टपर्यंत मुदत
पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा येत्या 24 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून पीएचडी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी येत्या 10 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)पीएचडी प्रवेशासाठी (PhD Admission) विद्यार्थ्यांकडून उस्पर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 6 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यातील 4 हजार 857 विद्यार्थ्यांनी पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेचे (PhD Admission Pre-Examination) शुल्क भरले आहे. पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षा (PhD-PET)येत्या 24 ऑगस्ट रोजी घेतली जाणार असून पीएचडी प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी येत्या 10 ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.
केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतात व प्रदेशात नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पीएचडी पदवी प्राप्त व्हावी, यासाठी अनेक विद्यार्थी पीएचडी प्रवेशाच्या प्रतीक्षेत होते. आतापर्यंत सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असली तरी 4 हजार 857 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जसह परीक्षा शुल्क भरले आहे. अद्याप परीक्षा अर्ज न भरलेल्या व शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना येत्या 10 ऑगस्टपर्यंत पीएचडी प्रवेश पूर्व परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे. पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा येत्या 24 ऑगस्ट रोजी घेतल्यानंतर परीक्षेचा निकाल 5 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.
अधिक माहितीसाठी डाऊनलोड लिंक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏