मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०२४

पद्मश्री नरेंद्र अच्युत दाभोलकर



       *पद्मश्री नरेंद्र अच्युत दाभोलकर*


      *जन्म : १ नोव्हेंबर १९४५*

                    (सातारा)

     *मृत्यू : २० ऑगस्ट २०१३*

                    ( पुणे )


मृत्यूचे कारण : अज्ञातच मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली


राष्ट्रीयत्व: भारतीय

नागरिकत्व : भारतीय

प्रशिक्षणसंस्था : मिरज वैद्यकीय 

                        महाविद्यालय

पेशा : वैद्यकीय

प्रसिद्ध कामे : अंधश्रद्धा निर्मूलन 

                      समिती

मूळ गाव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 

                दाभोली

ख्याती : साधना (साप्ताहिक)

पदवी हुद्दा : संपादक

           *कार्यकाळ*

१ मे १९९८ पासून मरेपर्तयंत

पूर्ववर्ती : वसंत बापट

धर्म : हिंदू

जोडीदार : शैला

अपत्ये : मुक्ता दाभोलकर पटवर्धन  

           (कन्या); डॉ. हमीद(पुत्र)

वडील : अच्युत लक्ष्मण दाभोलकर

आई : ताराबाई अच्युत दाभोलकर

नातेवाईक : डॉ. देवदत्त दाभोलकर 

                  (बंधू)


नरेंद्र अच्युत दाभोलकर  हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी इ.स. १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.ते स्वत या संघटनेचे अध्यक्ष होते. नरेन्द्र दाभोलकर यानच 20 औगस्त्त् 2013 रोजी पुणे या  ठिकाणी खून झाला.


💁‍♂ *जीवन*

वडील अच्युत लक्ष्मण दाभोलकर व आई ताराबाई यांच्या दहा अपत्यांपैकी नरेंद्र हे सर्वात धाकटे होय. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील माहुली या गावी झाला. सुप्रसिद्ध तत्त्वचिंतक कै. डॉ. देवदत्त दाभोळकर हे त्यांचे सर्वात थोरले बंधू होते. दाभोलकरानी शैला यांच्या बरोबर विवाह केला त्याना मुक्ता आणि हामिद हि दोन मुले आहेत. सामाजिक कार्यकर्ते  हामिद दलवाई ह य नावावरून त्यानि आपल्या मुलाचे नाव हामिद ठेवले .लग्न सोहळा व त्या मधील खर्च यावर ते सतत टिका करीत . आपल्या दोन्ही मुलानच विवाह त्यानि साध्या पद्धतीने केला.


🎓 *शिक्षण*

नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला. इ.स. १९७० साली मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा यथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला.


🔰 *सामाजिक कार्य*

बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. १९८२ साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. १९८९ मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर २००६पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.


🌀 *अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा*

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्यात येते. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधिमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते. 


📚 *साहित्य*

अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम - राजहंस प्रकाशन

अंधश्रद्धा विनाशाय - राजहंस प्रकाशन

ऐसे कैसे झाले भोंदू - मनोविकास प्रकाशन

ज्याचा त्याचा प्रश्न (अंधश्रद्धा या विषयावरील नाटक - लेखक : अभिराम भडकमकर). या नाटकाचे साडेचारशेहून अधिक प्रयोग झाले आहेत.

झपाटले ते जाणतेपण - संपादक नरेंद्र दाभोळकर व विनोद शिरसाठ.

ठरलं... डोळस व्हायचंय - मनोविकास प्रकाशन

तिमिरातुनी तेजाकडे - राजहंस प्रकाशन

दाभोलकरांच्या दहा भाषणांची सी.डी.

प्रश्न तुमचे उत्तर दाभोलकरांचे - डी.व्ही.डी, निर्माते - मॅग्नम ओपस कंपनी.

प्रश्न मनाचे (सहलेखक डॉ हमीद दाभोलकर) - राजहंस प्रकाशन

भ्रम आणि निरास - राजहंस प्रकाशन

मती भानामती- राजहंस प्रकाशन (सहलेखक माधव बावगे)

विचार तर कराल? - राजहंस प्रकाशन

विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी - दिलीपराज प्रकाशन

श्रद्धा-अंधश्रद्धा - राजहंस प्रकाशन (इ.स. २००२)


🏤 *दाभोलकरांच्या संस्था*

अंधश्रद्धा निर्मूलन समिती

परिवर्तन

साधना (साप्ताहिक)


⌛ *मृत्यू*

नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट, २०१३ मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरानजिक असलेल्या महर्षी शिंदे पुलावर (प्रचलित नाव ओंकारेश्वर पूल) अज्ञातांनी ४ गोळ्या झाडून हत्या केली. पुण्यामध्ये असताना ते रोज सकाळी घरापासून ते बालंगधर्व रंगमंदिरापर्यंत फिरायला जात असत.


मंगळवार २० ऑगस्ट, २०१३ रोजी सकाळी घरून निघाल्यावर दाभोलकर शिंदे पुलावरून रस्त्याच्या ओंकारेश्वर मंदिराच्या विरुद्ध बाजूला असलेल्या कडेने साधना साप्ताहिक कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. पुलावर असताना सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्यावर दोन अज्ञात हल्लेखोऱांनी चार गोळ्या झाडल्या. एक गोळी त्यांच्या पाठीच्या बाजूला लागली, एक चुकीच्या दिशेने गेली. चार गोळ्यांपैकी दोन गोळ्या त्यांच्या डोक्याला लागल्यामुळे दाभोलकर घटनास्थळीच कोसळले .

गोळीबार केल्यावर हल्लेखोर स्प्लेंडर दुचाकीवरून पळून गेले. हल्लेखोर २५ ते ३० वयोगटातील होते. हल्लेखोरांपैकी एकाने टोपी घातली होती आणि दुसऱ्याच्या पाठीवर बॅग होती. घटना घडल्यावर हल्लेखोर रविवार पेठेच्या दिशेने पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना बघितल्यावर पोलिसांना त्याबद्दल माहिती दिली.


पोलिसांनी दाभोलकरांना ससून रुग्णालयात हलविले. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दाभोलकर यांच्या शर्टच्या खिशामध्ये एक छायाचित्र आणि दोन धनादेश होते. त्यापैकी एका धनादेशावर दाभोलकर यांचे नाव लिहिले होते, असे पोलिसांनी सांगितले

छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले. 


🎖 *पुरस्कार*

अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनने त्यांच्यातर्फेचा पहिला समाजगौरव पुरस्कार ’अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ला दिला होता.

समाज गौरव पुरस्कार- रोटरी क्‍लब

दादासाहेब साखवळकर पुरस्कार

शिवछत्रपती पुरस्कार - कबड्डी

शिवछत्रपती युवा पुरस्कार - कबड्डी

पुणे विद्यापीठाचा साधना जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तेर)

भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (मरणोत्तर)


🏆 *दाभोलकरांच्या नावाचे*

 *पुरस्कार*

अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या महाराष्ट्र फाउंडेशनने २०१३सालापासून समाजहितार्थ एखाद्या कार्यात वाहून घेणाऱ्या व्यक्तीला डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार सुरू केला आहे. पहिल्याच वर्षी हा पुरस्कार महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (MKCL)चे व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांना जाहीर झाला आहे.


📚 *दाभोलकरांच्या हत्येच्या घटनाक्रमावरील पुस्तके*

 

📙 *दाभोळकरचे भूत*

श्याम पेठकर यांनी लिहिलेले दाभोळकरचे भूत या नावाचे एक नाटक हरीष इथापे यांनी दिग्दर्शित केले होते. समीर पंडित यांनी नाटकाची निर्मिती केली होती, आणि वैदर्भीय कलावंतांनी ते रंगभूमीवर आणले होते.


🙋‍♂ *उत्तर दाभोलकरांचे (पुस्तिका)*

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष (कै.) डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची सविस्तर मुलाखात त्‍यांच्या हत्येच्या तीन वर्षे आधी ‘प्रश्‍न तुमचा; उत्तर दाभोलकरांचे’ या शीर्षकांतर्गत झाली होती. श्रोत्यांच्या विविध शंकांचे त्यांनी नेमक्‍या शब्दांत निरसन केले होते. विनोद शिरसाठ यांनी ही मुलाखत घेतली होती. या मुलाखतीतल्या निवडक प्रश्‍नांचे संकलन या पुस्तिकेत करण्यात आले आहे.

        



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट