मनःपूर्वक अभिनंदन नीरज....
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील सुवर्णपदक जिंकण्याची भारताची सर्वात मोठी आशा नीरज चोप्राच्या रुपाने मावळली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय स्टारला पॅरिसमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ऑलिम्पिक रेकॉर्ड करत सुवर्णपदक जिंकले. त्याने रेकॉर्डब्रेक 92.97 मीटर भाला फेकला, जो ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोच्च आहे. नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 87.58 मीटरसह सुवर्णपदक पटकावले होते.
नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेकमध्ये 89.45 मीटर फेक करून रौप्य पदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले रौप्य आणि एकूण चौथे पदक आहे. यासह नीरज हा सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ सुशील कुमारला सलग 2 ऑलिम्पिक (2008 आणि 2012) मध्ये पदक जिंकता आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने यावेळी विक्रमी भालाफेक करत सुवर्णपदक मिळवलं आहे. नदीमने दोन वेळा 90 मीटरच्या पुढे भालाफेक केली. यामुळे नदीमच्या नावावर नवीन विक्रम प्रस्थिपित झाला आहे. अर्शद नदीम टोकियो ऑलिम्पिकमध्ये 5व्या स्थानी होता. तर पॅरिसमध्ये विक्रमी थ्रोसह सुवर्णपदक विजेता झाला आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏