अभिनंदन✌🌹🌹🌹🌹 *`महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 जाहीर`*
🎯 *मांतय्या चिन्नी बेडके - गडचिरोली*
एटापल्ली तालुक्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक मांतय्या बेडके
`अतिदुर्गम भाग, शिक्षणाबाबत पालकांसह मुलांमध्येही रुची नव्हती. ६०० लोकसंख्येचे गाव असतानाही इयत्ता १ली ते ४थीपर्यंत पटावर फक्त ७ विद्यार्थी. त्यातही ४ विद्यार्थी शाळेत यायचे तर ३ विद्यार्थी पालकांसमवेत शेतीकामे किंवा जंगलात वनोपज गोळा करायला जायचे. अशा स्थितीत ७ विद्यार्थ्यांवरून १४० पटसंख्येचा आकडा गाठणे, हे जिकरीचे कार्य; पण हे कार्य करून विद्यार्थी गुणवत्तेवर भर देत शाळेचा कायापालट केला, याच कार्याची पावती त्यांना मिळाली.`
🎯 *सागर चित्तरंजन बगाडे - कोल्हापूर*
चित्रकार, रंगकर्मी, नृत्यकर्मी व स. म. लोहिया हायस्कूलमधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे (रा.पाचगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
सागर बगाडे हे स्वतः उत्तम चित्रकार, रंगकर्मी व नृत्यदिग्दर्शक आहेत. सार्थक क्रिएशन या नृत्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकार घडवले आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक गाजवला आहे. यासह ते कोल्हापुरातील सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात अनाथ व निराधार बालके, सेक्सवर्कर अशा वंचित घटकांसाठी काम केले आहे. महापुरात नागरिकांच्या बचावकार्यात ते सहभागी होते.
`विद्यार्थ्यांसोबत त्यांनी शिवाजी महाराजांवर आधारित सादरीकरण तसेच महाराष्ट्रातील पाच दैवते या दोन विषयांवर एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोनवेळा रेकॉर्ड केला आहे.`
*`राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दोन्ही शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन`* 💐🌹💐🌹
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏