Mumbai Cricket Association Election)अध्यक्ष अमोल काळेयांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. आज एमसीएच्या (MCA Election) अध्यक्षपदासाठी पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं आहे
एमसीएच्या एकूण 375 मतदारांपैकी 335 प्रतिनिधींनी मतदान केलं आहे.मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाकरता प्रतिष्ठेची झालेली निवडणूक प्रक्रिया एमसीएच्या मुख्यालयात सुरु आहे. सध्याच्या समितीचे उपाध्यक्ष संजय नाईक आणि सचिव अजिंक्य नाईक पदावर असलेले दोन नाईक अध्यक्षपदासाठी एकमेकांच्यासमोर उभे ठाकलेत. यामुळं निवडणुकीत रंगत आली आहे.मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे, तेजस ठाकरे एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी आले नाहीत. याशिवाय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील मतदानाकडे पाठ फिरवली..अजिंक्य नाईक विजयी झाले आहेत.अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांना 221 मतं मिळाली आहेत.
संजय नाईक (Sanjay Naik) यांना 114 मतं मिळाली आहेत. अजिंक्य नाईक यांना 107 मतांनी विजय मिळाला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. अजिंक्य नाईक वयाच्या 38 व्या वर्षी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले आहेत. या विजयांनतर अजिंक्य नाईक यांनी हा विजय अमोल काळे यांचा असल्याचं म्हटलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏