मनःपूर्वक अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
भारताची युवा नेमबाज मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2024 मध्ये इतिहास घडवला. तिने कांस्य पदकावर आपली माेहर उमटवली आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक पटकविणारी ती देशाची पहिली नेमबाज ठरली आहे.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजी प्रकारत मनू भाकरने अंतिम फेरीत धडक मारली आहे. पात्रता स्पर्धेत तिने 580-27 गुणांसह तिसरे स्थान पटकावले होते. अंतिम सामन्या सुरुवातीपासून तिने अचूक लक्ष्य साधले. आज तिच्या कामगिरीत अचूकता आणि दृढनिश्चय याचे मिश्रण दिसून आले. पाच शॉट्सच्या पहिल्या राउंडला 50.4 शूट करून दुसरे स्थान पटकावले. मात्र दुसर्या राउंडमध्ये तिने प्रत्येकी 5 शॉट्सच्या दोन मालिकेनंतर एकूण 100.3अंकांसह मनू तिसर्या स्थानवर राहिली. तिसर्या राउंडमध्ये 121.2 गुणांसह मनू भाकर दुसऱ्या स्थानावर राहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏