blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

म्हणी व अर्थ



मराठी भाषा समृध्द आणि धारदार करणारा घटक म्हणून म्हणीकडे पाहिले जाते. कारण, म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. 'दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादीत स्वरुपाचे अर्थपूर्ण वाक्य' म्हणजे म्हण. म्हणी व त्यांच्या अर्थाची सांगड मुलांना घालता आली पाहिजे. म्हणीवर अनेक प्रकारे साधारणपणे दोन गुणांचा एक प्रश्न विचारला जातो. विद्यार्थ्यांना पाठ्यक्रमाव्यतिरिक्त या पुस्तिकेत दिलेला म्हणींचा संग्रह पाठ असणे गरजेचे आहे, त्यामुळे त्यांची शब्द संपत्ती सधन होण्याबरोबर त्यांची भाषाशैली प्रभावी होण्यास मदत होणार आहे.


आडात नाही तर पोहऱ्यात कोठून येणार ? - जे मुळात अस्तित्वातच नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणे व्यर्थ होय.


आपला हात जगन्नाथ आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. 

आलीया भोगासी असावे सादर जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. 

आयत्या बिळात (बिळावर) नागोबा-दुसऱ्यांच्या कष्टांवर स्वतःचा स्वार्थ साधणे.

 आवळा देऊन कोहळा काढणे-शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करुन घेणे.

 अंथरूण पाहून पाय पसरावे - ऐपतीच्या मानाने खर्च करावा.


आधी पोटोबा मग विठोबा - आधी स्वतःच्या पोटापाण्याचा (स्वार्थाचा) विचार करणे व नंतर अन्य (परमार्थाचे) काम करणे.


अती तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो.


अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो त्याच्या हातून काम बिघडते.


अडला हरी गाढवाचे पाय धरी - शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. 

असतील शिते तर जमतील भुते आपला भरभराटीचा काळ असला, तर आपल्याभोवती माणसे गोळा होतात.


आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी जेथे मदतीची गरज आहे, तेथे ती न पोचता भलत्याच ठिकाणी पोचणे.


आगीतून फुफाट्यात - लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन किमान लाभाची अपेक्षा केली असताना, अपेक्षेपेक्षा किती तरी अधिक लाभ होणे.


इकडे आड, तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे.


उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग - उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करणे.

कोल्हा काकडीला राजी - सामान्य कुवतीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात.


● खाई त्याला खवखवे - जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.


• खाण तशी माती (बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा) – आईवडलांप्रमाणे मुलांची वर्तणूक असणे.


• खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी - एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढे उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यांपैकी एकाचीच निवड करणे.


• खायला काळ, भुईला भार - निरुद्योगी मनुष्य सर्वांना भारभूत होतो.


• गरजवंताला अक्कल नसते - गरजू माणसास प्रसंगी मनाविरुद्ध गोष्टसुद्धा मान्य करावी लागते.


गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्विकारावा लागतो.


• गरज सरो, वैद्य मरो - आपले काम संपताच उपकारकर्त्याला विसरणे.


• गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय ? - केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.


• गाढवाला गुळाची चव काय ? - अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही. • गाव करी तो राव न करी (गाव करील ते राव काय करील?)- जे कार्य सामान्य माणसे एकजुटीच्या बळावर करु शकतात, ते कार्य एकटा श्रीमंत माणूस पैशाच्या बळावर करु शकणार नाही.


• गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली - एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करुन घेणे.


• गुरुची विद्या गुरुला फळली - एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे.


• गोगलगाय नि पोटात पाय एखाद्याचे खरे स्वरुप न दिसणे.


• घरोघरी मातीच्याच चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.


• चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच.


• चोराच्या मनात चांदणे आपले दुष्कृत्य उघडकीस येईल, अशी सदैव भीती वाटत राहणे.


चोर सोडून संन्याशाला सुळी देणे अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. • चोरावर मोर - एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करुन मात करणे.


• जळात (पाण्यात) राहून माशाशी वैर करू नये - जेथे राहायचे तेथील माणसांबरोबर वैरभाव ठेवू नये.


• जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे - दुसऱ्याच्या अडीअडचणी, त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत.

● नाचता येईना (म्हणे) अंगण वाकडे आपल्यातील उणेपणा झाकण्यासाठी दुसऱ्या वस्तूला नावे ठेवणे. (यश न मिळाल्यास सबबी सांगणे.)


• नाकापेक्षा मोती जड कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे, आपल्या सोईसाठी केलेली गोष्टच आपणास तापदायक ठरणे.


नावडतीचे मीठ अळणी नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्ट देखील वाईटच दिसते.


• पळसाला पाने तीनच कोठेही गेले तरी परिस्थिती तीच असणे.


● पाचामुखी परमेश्वर पुष्कळ लोक जे बोलतात तेच योग्य मानणे.


● पालथ्या घागरीवर (घड्यावर) पाणी केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे.


● पुढच्यास ठेच, मागचा शहाणा दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे.


● प्रयत्नान्ती परमेश्वर कितीही अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते.


• पदरी पडले पवित्र झाले कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषांकडे दुर्लक्ष करुन समाधान मानणे.


● पाचही बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्याच स्वभावाची वा योग्यतेची नसतात.


● पी हळद नि हो गोरी चुकीची अपेक्षा बाळगणे. कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी


● बळी तो कान पिळी बलवान माणूस इतरांवर हुकमत गाजवतो.


• बुडत्याचा पाय खोलात बाजूंनी होऊ लागते. माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक


• बैल गेला नि झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते.


• बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी - प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करणे. 


 भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा -तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती. भागवणे.


• भित्यापाठी ब्रह्मराक्षस भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.


• भरवशाच्या म्हशीला टोणगा ज्याच्याकडून खात्रीने अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे.


• भीक नको पण कुत्रा आवर ज्याच्याकडे मदतीच्या अपेक्षेने जावे त्याच्याकडून मदत न मिळता, उलट संकट ओढवणे.


• मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.


• मुलाचे पाय पाळण्यात दिसतात एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा, अंदाज त्याच्या बालपणीच बांधता येतो.

मनी वसे ते स्वप्नी दिसे- जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे.


वासरांत लंगडी गाय शहाणी - अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. 

● रात्र थोडी सोंगे फार कामे पुष्कळ, पण ती पार पाडायला वेळ न पुरणे,



● रोज मरे त्याला कोण रडे ? - नेहमीच घडणाऱ्या गोष्टीचे पुढे पुढे महत्त्व वाटेनासे होते.


● लहान तोंडी मोठा घास - आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे.


● लेकी बोले सुने लागे - एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे.


• शितावरून भाताची परीक्षा एखाद्या वस्तूच्या छोट्या भागावरुन संपूर्ण वस्तूची परीक्षा करता येणे.




• शेंडी तुटो की पारंबी तुटो - दृढनिश्चय करणे.


• सगळे मुसळ केरात- काम व्यवस्थित पार पडले असे वाटत असताना महत्त्वाची बाब राहून गेल्याचे लक्षात येणे.


साखरेचे खाणार त्याला देव देणार-भाग्यवान माणसाला सर्व परिस्थितीच अनुकूल असते.


• सुंठीवाचून खोकला जाणे - उपाययोजना करण्याअगोदरच संकट दूर होणे.


• सुंभ जळला तरी पीळ जात नाही- माणूस कितीही संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही.


• सरड्याची धाव कुंपणापर्यंत - सामान्य कुवतीच्या माणसाची झेप विशिष्ट मर्यादेतच असते.


• हाजीर तो वजीर - जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. • सत्तेपुढे शहाणपण नाही ज्याच्या हाती सत्ता आहे, त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसणे.


• हत्ती गेला नि शेपूट राहिले कार्याचा मोठा भाग पार पाडून थोडेसे काम शिल्लक राहणे.


• हलवायाच्या घरावर तुळशीपत्र दुसऱ्याच्या जिवावर स्वतः उदारपणा दाखवणे


• हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागणे जे खात्रीपूर्वक सहज मिळण्यासारखे आहे, ते सोडून ज्याच्या मिळण्याबद्दल खात्री नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करणे.


• हातच्या काकणाला आरसा कशाला ? प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टील पुराव्याची गरज नसते.


• डोंगर पोखरून उंदीर काढणे - अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे.


• शेरास सव्वाशेर - समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक सामर्थ्यवान माणूस भेटणे.


• टाकीचे घाव सोसल्यावाचून, देवपण येत नाही मोठेपणा मिळत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.