मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

गुरुवार, २५ जुलै, २०२४

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

 




 फादर फ्रान्सिस दिब्रिटो....


जन्म -४ डिसेंबर, १९४३ नंदाखाल, ठाणे

मृत्यू -२५ जुलै, २०२४ हे महाराष्ट्रातल्या वसई येथील कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू व मराठी लेखक होते. 


➡️ ख्रिस्ती व ज्यू धर्म हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय असून त्यांविषयी त्यांनी मराठीतून लेखन केले आहे.


➡️ सुबोध बायबल- नवा करार' या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.


➡️  फ्रान्सिस दिब्रिटो हे पुणे येथे झालेल्या १५व्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.


➡️  प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान (१४-७-२०१७)


➡️  उस्मानाबाद येथे जानेवारी २०२०मध्ये ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद (२२ सप्टेंबर २०१९ची बातमी)


➡️  जळगावला भरलेल्या अकराव्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद



साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. 

82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे 

फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली. 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे 1983 ते 2007 या दरम्यानच्या काळात 'सुवार्ता'चे मुख्य संपादक होते.  

हरित वसई संरक्षण समिती'च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली होती. वसईतील 'राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण' यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबविली.


संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची हे पुस्तक लिहिण्यासाठी दिब्रिटो यांनी बराच काळ इस्रायलमध्ये राहून संशोधन केले होते

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची साहित्यसंपदा


- आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा

- ओअॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ - दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर 'इन सर्च ऑफ दि ओॲसिस'; अनुवादक - फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो)

- ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र)

- ख्रिस्ती सण आणि उत्सव

- तेजाची पाऊले (ललित)

- नाही मी एकला (आत्मकथन)

- संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास

- सुबोध बायबल - नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद)

- सृजनाचा मळा

- सृजनाचा मोहोर

- परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक)

- मुलांचे बायबल (चरित्र)




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट