blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद
मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

महत्वाच्या लिंक IMP

बोधकथा


*म्हातारी व वैद्य*

एका म्हातारीच्या डोळ्यांत 'फुले' पडल्याने तिला बरेच कमी दिसू लागले. तिने आपले डोळे गावातल्या एका नामवंत वैद्याला दाखविले व त्याचे औषध सुरू केले. तो वैद्य दररोज तिच्या घरी येई, तिच्या दोन्ही डोळ्यांत औषध घाली आणि तिच्या डोळ्यांना पट्टी बांधी. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी येई, आदल्या दिवशीची पट्टी सोडून व नव्याने औषध घालून तो तिच्या डोळ्यांना नवी पट्टी बांधी. तिचे डोळे सदैव बांधलेले असल्याने, तो तिच्याकडून जाताना तिच्या घरातल्या एक-दोन वस्तू चोरून नेई. दोन महिन्यांनी जेव्हा तिला चांगले दिसू लागले व तिच्या डोळ्यांवरील पट्टी कायमची काढण्यात आली. तेव्हा तिला आपल्या घरातल्या सर्व वस्तू वैद्याने लांबविल्या असल्याचे आढळून आले. तिने त्याबद्दल त्या वैद्याला एका शब्दानेही विचारले नाही. फक्त औषधोपचाराचे पैसे देण्याचे नाकारले. यावर त्या पैशांच्या वसुलीसाठी, वैद्याने त्या म्हातारीविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला.

वैद्याला औषधाचे पैसे न देण्याचे कारण न्यायमूर्तीनी त्या म्हातारीला विचारता ती म्हणाली, "महाराज, या वैद्याचे औषध सुरू करण्यापूर्वी माझ्या डोळ्यांना जरी बरेच कमी दिसत होते, तरी अंधुक अंधुक का होईना, घरातल्या सर्व वस्तू दिसत होत्या व चाचपडल्या असता हातांना लागत होत्या. परंतु डोळ्यांवरचे या वैद्याचे औषधोपचार पूर्ण झाल्यापासून मला घरातली एकही वस्तू दिसत नाही किंवा हातांना लागत नाही."

त्या म्हातारीच्या बोलण्यामागे दडलेला अर्थ न्यायमूर्तीना समजला. त्यांनी त्या वैद्याच्या घरावर शिपायांची धाड घालून, त्याच्या घरात दडवलेल्या म्हातारीच्या सर्व वस्तू तिला परत करण्याचा व त्यांच्या चोरीच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून त्याला औषधापोटी म्हातारीने एक पैसाही न देण्याचा हुकूम फर्मावला. वैद्याची चोरी उघडकीस आली, चोरलेल्या सर्व चीजवस्तूही गेल्या आणि त्याबरोबरच चोरी केल्यामुळे अब्रूही गेली.

*तात्पर्य :* अति लोभ संकटाना निमंत्रण देतो.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

ब्लॉग वरील सर्व पोस्ट वाचा.