मी विजयकुमार किसन भुजबळ Knowledge is Power या ब्लॉगवर सहर्ष स्वागत करत आहे WELCOME TO MY EDUCATIONAL BLOG KNOWLEDGE IS POWER THANKS FOR VISIT MY BLOG AND FOLLOW MY BLOG
इयत्ता पाचवी नवोदय परीक्षा स्कॉलरशिप परीक्षा स्पर्धा परीक्षा उपयुक्त वेब साईट * FOLLOW MY BLOG

blog html


knowledge is power ब्लॉग वरती शालेय माहिती , परिपत्रके , मासिके , विविध पुस्तके , प्रेरणादायी व्हीडीओ , शासन निर्णय , विविध योजना ,online पेमेंट सामान्य ज्ञान टेस्ट , वृत्तपत्रे, प्रेरणादायी लेख ,स्पर्धा परीक्षा टेस्ट ,स्कॉलरशिप परीक्षा टेस्ट यांची माहिती मिळणार आहे .


 

माझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद

शुक्रवार, १९ जुलै, २०२४

सोडायला शिका.....

 *सोडायला शिका.....* 


*एकदा मी देव पुजा करत होतो. पुजा झाल्यावर मी समईची ज्योत पेटविली. त्या ज्योतीला लावुन अगरबत्ती पेटवताना उदबत्ती हातातुन निसटली. गडबडीत उदबत्ती पकडण्याचा प्रयत्न करताना माझा हात समईला लागला.*

        *समई खाली कलंडताना तेलासकट देव्हाऱ्यातील हळदी कुंकवाच्या पंचपाळावर पडली आणि झालेला राडा सावरायला जवळपास अर्धा तास गेला.*

       *खाली पडणाऱ्या अगरबत्ती पकडण्याच्या हव्यासापोटी हे सर्व झाले. अगरबत्ती खाली पडली असती तर विशेष असा काय फरक पडला असता. अगरबत्ती कांही मोडणार नव्हती किंवा वाया जाणार नव्हती आणि समजा वाया गेलीही असती तरी तिची किंमत ही साफसफाईसाठी वाया गेलेला वेळ, तेल, हळदी, कुंकू, तांदुळ, तेलकट झालेलं मंदिर यापेक्षा तर जास्त नक्कीच नव्हती.*


         *आपण आयुष्यात सुद्धा अशाच उदबत्तीसारख्या अनेक गोष्टी उगीचच धरण्याचा प्रयत्न करत असतो. क्षुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी निसटून जातात.*

*त्यामुळे क्षुल्लक गोष्टी सोडुन देणेच हितकारक.*


*मला रामराम केला नाही,*

*मला निमंत्रणच दिलं नाही,*

*स्टेजवर माझं नावंच घेतलं नाही,* 

*वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाहीत,*

*माझा फोनच घेतला नाहीं,*

*मला बसायला खुर्चीचं दिली नाही,*

*मला उधारीच मागितली,*

*मला कोणी मदतचं केली नाही,*

*माझ्या पोस्टला लाईकच केले नाही,*

*साडीच हलकी दिली...*

*इत्यादी इत्यादी ..*


*किरकोळ बाबी, अहंकार सोडला आणि मग पहा....*

*निसटुन चाललेल्या नात्यांमधे पुन्हा आपलेपणा येईल*


*अहंकार आपल्याला आपल्या माणसापासून तोडतो. अहंकार लगेच सोडता येणार नाही पण कठीणही नाही. आजच प्रयत्न सुरु करा.*


*किरकोळ मतभेद मिटवा आणि आनंदी व्हा.*

*मतभेद पराकोटीचे, गंभीर स्वरुपाचे असतील तर तो विषय मात्र वेगळेपणाने, शांतपणाने मिटवा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏

लोकप्रिय पोस्ट