शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढावे म्हणून सुधारित पद्धतींचा वापर करतात.
सुधारित बियाण्यांचा वापर, सिंचनाच्या आधुनिक पद्धतींचा वापर, पिकांचे कीड आणि रोगांपासून संरक्षण आणि धान्याची योग्य साठवण या मार्गांनी शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढवता येते.
- संशोधन करून मुद्दाम तयार केलेले दर्जेदार सुधारित बियाणे वापरल्याने शेती उत्पादन वाढते.
- तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या सिंचनाच्या आधुनिक पद्धती आहेत. सिंचनाच्या या सुधारित पद्धतींमुळे तेवढ्याच पाण्यात अधिक जमीन भिजते.
- शेतीतील पिकाला पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीने खूप पाणी पिकापर्यंत पोचण्यापूर्वीच वाया जाते.
- पीक संरक्षणासाठी कीड आणि रोगजंतू मारणारी रसायने पिकांवर फवारली जातात; तसेच बियाणे पेरण्याआधी त्यावर जंतुनाशके चोळली जातात.
शेतातून आणलेले धान्य नीट साठवणे हे महत्त्वाचे आहे.
धान्य साठवताना ते वाळवून पोत्यात भरतात. ही पोती घरात, गोदामात किंवा दुकानात रचून ठेवतात.
धान्य कणगी किंवा कुडांच्या टोपल्यांत साठवले जाते. त्यामुळे धान्याभोवती हवा खेळती राहते.
कीड-मुंगी वा उंदीर-घुशी यांच्यामुळे धान्याची नासाडी होते.
दमट व कोंदट जागी धान्य साठवल्यास धान्याला बुरशी लागू शकते. त्यामुळे बरेच नुकसान होऊ शकते.
कीड-मुंगीचा उपद्रव टाळण्यासाठी धान्यसाठवणीच्या जागी आणि धान्यसाठ्याभोवती रसायने फवारतात. काही संरक्षक रसायने धान्यसाठ्यातही ठेवतात.
कीड-मुंगीचा उपद्रव टाळण्यासाठी कडुनिंबाचा पाला धान्यसाठ्यात घालतात.
- धान्य साठवण्याची जागा नेहमी कोरडी असावी. तेथे हवा खेळती असावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏