• स्थान, विस्तार व सीमा
* अक्षवृत्तीय विस्तार : 5°16' उत्तर ते 33°45' दक्षिण.
* रेखावृत्तीय विस्तार : 34°45' पश्चिम ते 74°3' पश्चिम.
* देशाच्या पूर्वेला अटलांटिक महासागर ईशान्येस माराजों बेट आहे.
• प्राकृतिक रचना
* प्राकृतिक रचनेच्या दृष्टीने देशाचे अॅमेझॉन नदीचे खोरे आणि ब्राझीलचे पठार असे प्रमुख दोन भाग पडतात. अॅमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या उत्तरेस गियानाचा उंचवट्याचा प्रदेश आहे. पांढरीशुभ्र वाळू हे ब्राझीलच्या पठाराचे वैशिष्ट्य आहे.
• हवामान
* हा देश उष्ण कटिबंधात येतो. उत्तरेकडील भागातून विषुववृत्त जाते. त्यामुळे या भागात तापमान जास्त असते. पठारी प्रदेशातील हवामान थंड असते. किनारपट्टीला समुद्र सान्निध्यामुळे उन्हाळे सौम्य व आर्द्र असतात. अॅमेझॉनच्या खोऱ्यात पाऊस 1800 ते 2000 मिमी. पडतो.
• नैसर्गिक साधनसंपत्ती
• वनस्पती : सदाहरित विषुववृत्तीय वने (सेल्वा) रबर, महोगनी, रोजवुड, ऑर्किड इत्यादी प्रकारचे वृक्ष.
* प्राणी व पक्षी : जॅग्वार, मुंगीभक्षक, अॅनाकोंडा अजगर, माकडे, रंगबेरंगी फुलपाखरे, आकर्षक पोपट व गाणारे पक्षी
* खनिजे : लोह, मँगनीज, निकेल, तांबे, बॉक्साइट, टंगस्टन, हिरे इत्यादी.
• व्यवसाय
1. शेती : कॉफी, कोको, रबर, तंबाखू, कापूस, ऊस यांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन. अननस, मोसंबी, केळी, संत्री यांच्या मोठ्या बागा. कॉफी, कोको व रबराच्या उत्पादनात जगात अग्रेसर.
सॅव्हाना गवताळ प्रदेशात पशुपालन चालते.
2. मासेमारी : अटलांटिक समुद्र किनाऱ्यावर मासेमारीचा व्यवसाय चालतो. लॉबस्टर, शिंपले, सार्डिन, पिरान्हा या जातीचे मासे सापडतात.
3. उद्योग : स्वयंचलित वाहने, विद्युत साहित्य, सिमेंटनिर्मिती, अन्नप्रक्रिया, साखर कारखाने, सुती, रेशमी, लोकरी कापडनिर्मिती.
4. वाहतूक व संदेशवहन : रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्ग यांचे जाळे पूर्व किनारपट्टीवर आढळते. जलवाहतुकीचाही विकास झाला आहे.
5. व्यापार : कॉफी, कोको, साखर, कापूस, तंबाखू, संत्री, केळी, लोहखनिज यांची निर्यात तर यंत्रे, खनिज तेल, वंगणे, रासायनिक उत्पादने, खते, अवजड वाहने, गहू इत्यादी पदार्थांची आयात होते.
6. पर्यटन : स्वच्छ, शुभ्र वाळूचा आकर्षक समुद्रकिनारा निसर्ग सौंदर्याने नटलेली बेटे, फळबागा, अॅमेझॉन खोऱ्यातील अरण्ये, विविध पक्षी पाहण्यासाठी असंख्य पर्यटक देशात येतात.
• लोकजीवन
* येथील लोकांचा धर्म ख्रिश्चन व भाषा पोर्तुगीज आहे.
* स्त्रिया विविधरंगी लांब स्कर्ट व ब्लाउज घालतात तर पुरुष शर्ट, पँट असा पोषाख करतात.
* लोकांच्या आहारात गव्हापासून बनवलेला पाव, मांस, कॅसाव्हा, कंद,
मासे, भाज्या, फळे इत्यादी पदार्थांचा समावेश असतो.
* कार्निव्हल हा लोकप्रिय उत्सव तर सॉकर हा लोकप्रिय खेळ आहे.
• महत्त्वाची शहरे
1. ब्राझीलिया : ब्राझीलची नवी राजधानी, राष्ट्रपती भवन, सर्वोच्च न्यायालय येथे आहे.
2. सॅओपाली : उत्कृष्ट बंदर व दाट लोकसंख्येचे शहर, 'बुटॅन्टन' संस्थेत सर्पदंशावर गुणकारी औषध तयार केले जाते.
3. रिओ डी जानेरो : उत्तम बंदर व व्यापाराचे केंद्र, ब्राझीलची पूर्वीची राजधानी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏