पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेची प्रतिक्षा अखेर संपली आहे. प्रमुख पाहुणे असलेल्या फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्राँ आणि आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी सीन नदीच्या पुलावरुन फ्रान्सचा झेंडा फडकावला.
यासह भव्यदिव्य अशा उद्घाटन समारंभाचा श्रीगणेशा झाला. उपस्थितांना सीन नदीवर 100 बोटींमधून जाणाऱ्या विविध देशांच्या 10 हजारांपेक्षा अधिक खेळाडूंना पाहता आलं. खेळाडूंनीही चाहत्यांचे अभिवादन स्वीकारले. खेळाडूंच्या चेहऱ्यावर आपण देशाचं प्रतिनिधित्व करतोय, याचा वेगळाच आनंद दिसून येत होता. ऑलिम्पिकच्या इतिहासात उद्घाटन समारंभाचं आयोजन स्टेडियमबाहेर करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभात भारतीय खेळाडू हे पारंपरिक पेहरावात दिसले. भारतीय चमूचं नेतृत्व हे पीव्ही सिंधू आणि शरत कमल या दोघांनी केलं. यासह भारतासाठी ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पीव्ही सिंधू आणि शरत कमल या दोघांचं नाव धव्जवाहकांच्या यादीत जोडलं गेलं
सीन नदीत झालेल्या भारताच्या संचलनात एकूण खेळाडूंपैकी 78 जण होते. भारतातून या स्पर्धेत एकूण 117 खेळाडू सहभागी झाले आहेत. या सर्व खेळाडूंकडून मेडल्सची अपेक्षा आहे.
पहिला मान ग्रीसला
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण 206 देशांमधील 10 हजार 714 खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यापैकी एकट्या अमेरिकेचे सर्वाधिक 592 खेळाडू आहेत. मात्र त्यानंतरही या संचलनाची सुरुवात करण्याचा मान हा ग्रीसला मिळाला. ग्रीस देशाची बोट सर्वात आधी सीन नदीत आली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏