कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा घेण्यात येत होत्या, तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, अधिनियम २०२३ दि. २३/०२/२०२४ पासून लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ कलम ८ मधील तरतुदीनुसार सन २०२४-२०२५ पासून शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा, मंडळाकडून घेण्यात येणार आहे.
शासकीय रेखाकला परीक्षेच्या पुर्नरचित अभ्यासक्रमास दिनांक १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२४, दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ ते दिनांक २८ सप्टेंबर, २०२४ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे.
संबंधित सर्व केंद्र प्रमुख यांना कळविण्यात येते की, शासकीय रेखाकला परीक्षेकरिता विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी करताना दोन्ही पैकी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) एकाच परीक्षेसाठी सर्वसाधारण नोंदवहीतील (General Register) नावाप्रमाणे अचूक नावाची ऑनलाईन नोंदणी करावी. शासकीय रेखाकला परीक्षा केंद्रांची नोंदणी, विद्यार्थ्यांची नोंदणी व परीक्षा फी ऑनलाईन पध्दतीने https://www.msbae.org.in या संकेतस्थळावर भरावयाची असल्यामुळे याबाबत सदर परीक्षेस प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या सर्व संबंधित विद्यार्थी, पालक व सहभागी शाळा यांच्या शासकीय रेखाकला परीक्षा केंद्र प्रमुख यांनी निदर्शनास आणावे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक तसेच ऑनलाईन पध्दतीने करण्यात येणाऱ्या नोंदणीचा तक्ता खालील प्रमाणे.
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा- २०२४
परिपत्रक डाऊनलोड करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏