पशुसंगोपन शास्त्रामध्ये पशूचे संगोपन, पालन, संवर्धन आणि उपयोग यांची शास्त्रीय माहिती असते. प्राण्यांचे मांस आणि दूध यांचा अन्न म्हणून उपयोग होतो.
इंधन आणि खत अशा दुहेरी उपयोगासाठी बायोगॅस तंत्रज्ञान विकसित पावले आहे. जनावरांच्या कातड्यांपासून पट्टे, पर्स, मोट, पखाल घोड्याचे खोगीर, चपला, बूट बनवतात. जनावरांच्या हाडांपासून खते तयार करतात. उदा. बोनमील. शोभेच्या वस्तू, कंगवे हाडांचे करतात
हाडांतील सरसचा उपयोग गोंद किंवा जिलेटिन म्हणून करतात.
जनावरांच्या आतड्यांपासून बनवलेल्या तातेचा शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवण्यासाठी उपयोग होतो. तसेच तंतुवाद्यांतही त्याचा उपयोग करतात.
डुक्कर आणि उंट यांच्या मानेवरील व शेपटीवरील केसांचा ब्रश करतात.
जनावरांच्या चरबीचा उपयोग साबण, मेणबत्ती आणि ग्रीसनिर्मितीत करतात.
कबूतर पक्ष्याचा उपयोग संदेश पाठवण्यासाठी होतो.
गवत, कडबा हे गाय, म्हैस बैल यांचे मुख्य अन्न तसेच आणि हरभरे हे घोड्याचे मुख्य अन्न असते.
दुभत्या जनावरांना रोज आंबोण (पेंड, धान्याचे भरड आणि गूळ) दिले जाते.
डुकरे पुष्ट होण्यासाठी त्यांना तांदळाचा भुस्सा, कोंडा, हाडाचा भुगा आणि वाया गेलेले अन्न देतात. बोकडांना गव्हाचा कोंडा, मका, जवसाची पेंड खायला घालतात.
प्रत्येक प्राण्यास त्याच्या वजनाच्या दोन ते अडीच टक्के कोरडा आहार त्याला रोज मिळणे आवश्यक असते.
जनावरांच्या गोठ्यांची जागा पाण्याचा उत्तम निचरा होणारी, उंचावरची व कोरडी असावी.
जनावरांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठ्याची फरशी जंतुनाशकाने नियमितपणे धुवावी त्यामुळे त्यांना माशा, चिलटे, पिसवांपासून त्रास होणार नाही.
जनावरांना अधूनमधून जंतनाशक औषधे द्यावीत.
मेंढ्याचे उवा गोचिडांपासून संरक्षण करावे.
कोंबडीला बर्ड फ्ल्यू व राणीखेत रोग झाल्यास त्यांवर कोणतेच औषध नाही.
कुत्र्याला किंवा इतर जनावरांना रेबीज झाला तर त्यावर इलाज उपलब्ध नाही.
जनावरांना ठरावीक काळानंतर प्रतिबंधक लसी टोचाव्या.
भारतीय गाईंचा जर्सी, होल्स्टन किंवा रेड डीनशी संकराने मिळणाऱ्या पैदाशीपासून जवळजवळ दुप्पट म्हणजे 10 ते 12 लीटर दूध मिळते.
महाराष्ट्रातील कंधरी, देवणी, खिलारी, डांगी जातींच्या गाईंची संकर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर निवड
झालेली आहे. पशुपालन हा शेती व्यवसायाचा जोडधंदा आहे. यांत मेंढीपालन, कुक्कुटपाल, वराहपालन तसेच रेशीम, मोती, लाख आणि मत्स्योत्पादन यांचाही समावेश होतो.
मेंढ्यांच्या खाण्यासाठी खास तरतूद करावी लागत नाही.
मेंढ्यांपासून लोकर, मांस, कातडी मिळते. मेंढ्यांना शेतात बसवून खत मिळवता येतो.
एका भारतीय मेंढीपासून एक ते दीड किग्रॅ लोकर आणि 10 ते 15 किग्रॅ मास मिळते.
कोंबड्यापासून मांस आणि अंडी मिळतात. लेअर्स कोंबड्या अंडी देतात ब्रॉयलर कोंबड्या मांस मिळविण्यासाठी वाढवतात. लेगहॉर्न कोंबड्या वर्षातून 200 ते 250 अंडी देतात.
अंड्यांतून पिल्लू मिळण्याची शक्यता नसलेल्या अंड्यांना टेबल एग्ज म्हणतात.
मांस मिळवण्यासाठी होड आयलंड रेड, व्हाईट लेगहॉर्न या परदेशी कोंबड्यांचा वापर होतो.
समुद्राच्या तळाशी आढळणाऱ्या ऑयस्टर प्राण्यांपासून मोती मिळतात.
वाळूच्या कणाचे ऑयस्टरच्या शरीरात रोपण करून मोठ्या आकाराचे मोती म्हणजे कल्चर्ड मोती तयार करण्याचे तंत्र विकसति झाले...
निवडुंगावर किंवा पळसाच्या झाडावर वाढणारे किडे लाखेची निर्मिती करतात केवळ भारत देशातच लाख
निर्मिती केली जाते.
रेशीम किड्यांपासून उच्च प्रतीचा रेशीम धागा मिळतो.
1. तुतीची पाने खाणाऱ्या रेशीम किड्यापासून तलम रेशीम मिळते.
2. ऐनाची पाने खाणाऱ्या रेशीम किड्यापासून मजबूत म्हणजे टसर रेशीम मिळते.
अंडी, अळी, कोश आणि पतंग या चार अवस्था रेशीम किड्याच्या जीवनक्रमात आढळून येतात.
कोश पाण्यात उकळवून त्यापासून रेशीम धागा मिळवतात.
आता समुद्रात किंवा साठलेल्या पाण्यात विशिष्ट मत्स्यबीज सोडून माशांचे संवर्धन केले जाते.
माशांचा सागरी अन्नात समावेश होतो.
गोड्या पाण्यात कटला, रोह, मृगळ, कार्प जातींच्या माशांची पैदास होते.
खाऱ्या पाण्यात बोय, मुडदुशी, रेणवी, चॅनॉस, खसी जातींच्या माशांची पैदास होते.
माशांचा अन्न म्हणून वापर करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please write comment आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया बद्दल मनःपूर्वक आभारी आहोत..🙏🙏